मुंबई, 23 जानेवारी : खेळताना (sports) आपल्या टीमनं बाजी मारली किंवा आता आपली टीम जिंकणार आहे हे समजताच प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. मग मैदानातच हा उत्साह बाहेर पडतो. प्रत्येकाचा आपला आनंद व्यक्त करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. खेळाडूंचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जे पाहिल्यानंतर खरंतर आपल्यालाही एक स्फूर्ती मिळते. पण सध्या सोशल मीडियावर (social media) अशाच एका खेळाडूच्या जोषाचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. जो पाहून काळजात धडकीच भरते. सोशल मीडियावर बास्केटबॉलचा (basketball) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन टीम बास्केटबॉल कोर्टमध्ये (basketball court) खेळत आहेत. त्यावेळी नेटजवळ असलेला एक खेळाडू नेटवरच लटकतो आणि त्यानंतर मोठी दुर्घटना घडते.
व्हिडीओत पाहू शकता, जेव्हा हा खेळाडू नेटवर लटकतो. तेव्हा फक्त नेट नाही तर नेट ज्या रॉडला लावण्यात आलं आहे, तो संपूर्ण रॉडच खाली येतो आणि झेलकावे घेतो. तेव्हा तिथं सर्व खेळाडू असतात. जर एखाद्याला जरी याचा धक्का लागला असता तर कदाचित त्याचा जीवही गेला असता. सुदैवानं तसं काही झालं नाही. हे वाचा - ‘वंदे मातरम’नं दणाणून निघालेल्या स्टेडिअमचा तो VIDEO ऑस्ट्रेलियाचा नव्हेच @brhoops ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बास्केटबॉल कोर्टमध्ये आपण असा मूर्खपणा याआधी कधीच पाहिला नाही, असं हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला शॉक बसला आहे. व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. कृपया असं कोणीच करू नये, नाहीतर एखाद्याचा जीवही जाईल, असं आवाहन बहुतेक नेटिझन्सनी केलं आहे.