मराठी बातम्या /बातम्या /Viral /IND vs AUS : भारताच्या विजयानंतर 'वंदे मातरम'नं दणाणून निघालेल्या स्टेडिअमचा 'तो' VIDEO ऑस्ट्रेलियाचा नव्हेच

IND vs AUS : भारताच्या विजयानंतर 'वंदे मातरम'नं दणाणून निघालेल्या स्टेडिअमचा 'तो' VIDEO ऑस्ट्रेलियाचा नव्हेच

जे कुणालाही वाटलं नाही ते भारतीय संघाने करून दाखवलं. यानंतर सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) झाले.

जे कुणालाही वाटलं नाही ते भारतीय संघाने करून दाखवलं. यानंतर सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) झाले.

जे कुणालाही वाटलं नाही ते भारतीय संघाने करून दाखवलं. यानंतर सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) झाले.

नवी दिल्ली, 22 जानेवारी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (IND VS AUS) भारताने अनेक अडचणींचा सामना करत अवघड मालिका खिशात घातली.  अनुभवी ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय टीमनं त्यांच्याच देशात धूळ चारली. जे कुणालाही वाटलं नाही ते भारतीय संघाने करून दाखवलं. यानंतर सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) झाले. त्यापैकीच एक व्हिडीओ म्हणजे ऑस्ट्रेलियातील  क्रिकेट स्टेडिअममध्ये सर्व लोक एका सुरात वंदे मातरम (Vande mataram) गाऊ लागले.

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया टीम हरल्यानंतर आणि भारत जिंकल्यानंतर सोशल मीडियावर वंदे मातरमचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमामात व्हायरल झाला. ज्यामध्ये बहुतेक लोकांनी हातात तिरंगा धरला आहे आणि स्टेडिअम वंदे मातरमच्या सुरांनी दणादणून निघाला. हा व्हिडीओ इंडिया-ऑस्ट्रेलियातील गाबा मॅचचा असल्याचं सांगितलं जात होतं. पण खरं तर हा व्हिडीओ तिथला नाही.

विश्वास न्यूजनं या व्हिडीओची पडताळणी केल्याचं सांगतिलं आणि त्यानुसार हा व्हिडीओ दुबईतील स्टेडिअममधील एक जुना व्हिडीओ असल्याचं समोर आला आहे. हा व्हिडीओ आता गाबामधील असल्याचं पसरवलं जात आहे.

" isDesktop="true" id="515535" >

जेव्हा हा व्हिडीओ गुगलवर सर्च करण्यात आला तेव्हा Dylan Noel Saldanha यूट्युब चॅनेलवर 24 सप्टेंबर 2018 ला अपलोड झालेला होता. या व्हिडीओमध्ये दुबई क्रिकेट स्टेडिअममध्ये हजारो भारतीय गात असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाय काही स्पोर्ट्स तज्ज्ञांनीदेखील हा व्हिडीओ गाबा स्टेडिअमचं नसल्याचं सांगितलं आहे.

हे वाचा - IND vs AUS: रवी शास्त्रींच्या इशाऱ्यानंतर ऑस्ट्रेलियानं बदलला 'तो' निर्णय!

व्हिडीओतील स्टेडिअमची रचना पाहिली तर तो गाबाचा नाही तर दुबईतील रिंग ऑफ फायरचा लायटिंग स्टेडिअम आहे. गेट्टी इमेजवरदेखील दुबईतील या स्टेडिअमचा फोटो मिळालेला आहे. जो व्हायरल होणाऱ्या व्हिडीओप्रमाणेच आहे. तर इथंच गाबा स्टेडिअम सर्च केलं असता गाबा स्टेडिअमची फ्लड लाइट बाऊंड्रीचा शेप या व्हिडीओतील स्टेडिअमपेक्षा वेगळा आहे.

हे वाचा - Sex Scandal! महिला अधिकारीसोबत हॉटेल रुममध्ये सापडला एक प्रसिद्ध क्रिकेटर

तसंच AK ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला होता. हे ट्विटर ते अकाऊंट 2016 साली बनवण्यात आलं आहे. जिथं स्पोर्ट्सशी संबंधित पोस्ट केल्या जातात. पण फक्त 947  लोक या युझरला फॉलो करतात.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Sports