नवी दिल्ली, 17 एप्रिल: सध्या देशभरातील कोरोनाची (Corona in India) स्थिती अतिशय बिकट झाली असून दिवसा दोन लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोना संक्रमण (Corona Spread) साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. विषाणूच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे संक्रमणाचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in India) होईल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, गेल्या वेळची आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फरक आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शिवाय देशातील काही शहरांमध्ये देखील संचारबंदी आहे, मात्र अद्याप संपूर्ण देशात लॉकडाऊन अशी कोणतीच घोषणा करण्यात आली नाही आहे. या काळात सोशल मीडियावरून बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. एका एडिट केलेल्या फोटोवरून असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारकडून 15 ते 30 एप्रिल पर्यंत देशभरात लॉकडाऊन लावला जाईल. लॉकडाऊन कोणालाही नकोच आहे, मात्र या पद्धतीच्या अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. मात्र, या फोटोवरून केला जात असलेला लॉकडाऊनचा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून 15 ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावला जाईल, अशी कोणती घोषणा सरकारकडून केलेली नाही. (हे वाचा - केंद्राकडून पत्राची दखल आणि राज ठाकरेंनी मानले PM मोदींचे आभार )
काहींनी फोटो एडिट करून माध्यमांच्या फोटो प्रमाणे ‘व्हायरस से कौन बचाये, अब लॉकडाऊन ही उपाय है’, असे लिहून व्हायरल केला त्यामुळे अनेकांना काळजी वाटू लागली होती. सरकारी सत्यता पडताळून पाहणाऱ्या पीआयबी (PIB) संस्थेने ह्या फोटोविषयी माहिती दिली आहे. आम्ही तपासणी करून पाहिली असून हा फोटो खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने आतापर्यंत कोरोना लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पीआयबी फॅक्ट चेककडून लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या खोट्या फोटोंवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर असे फोटो शेअर करू नका. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. (हे वाचा - बापरे! थेट विमानतळावर पोहोचला भला मोठा विषारी साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIRAL VIDEO ) लोकांच्या हातात सध्या स्मार्टफोन आले असून आणि सर्वसाधारण दरामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याने यावरून एखाद्या खऱ्या माहितीऐवजी कधी-कधी खोटी माहितीच अधिक पसरल्याचे दिसून येते. व्हॉट्सअपवरून लोक असे संदेश पुढे पाठवत राहतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्यामुळे शेवटी पीआयबी फॅक्ट चेककडून लोकांना तो फोटो खोटा असल्याचे सांगावे लागले.