JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: ATM मशिनमध्ये जाऊन बसला भलामोठा साप; लोक पैसे काढायला येताच.., थरकाप उडवणारी घटना

Viral Video: ATM मशिनमध्ये जाऊन बसला भलामोठा साप; लोक पैसे काढायला येताच.., थरकाप उडवणारी घटना

अलीकडेच एका बँकेच्या एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एटीएम मशीनच्या आत साप बसलेला दिसला.

जाहिरात

एटीएम मशीनमध्ये शिरला साप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 21 जुलै : पावसाळा खूप धोकादायक ठरू शकतो. कारण पावसाळ्यात अनेक धोकादायक प्राणी बाहेर येऊ लागतात. विशेषत: साप-विंचू बाहेर येण्याचं प्रमाण पावसाळ्यात खूप वाढतं. त्यामुळेच कधी घराबाहेर असलेल्या स्कूटीमध्ये साप घुसतात तर कधी टॉयलेट सीटवर जाऊन बसलेले दिसतात. साप विषारी असो वा नसो, पण तो समोर दिसताच लोक घाबरतात. तो छोटा साप असो किंवा मोठा, त्याच्यापासून जितकं दूर राहाल तितकं चांगलं. पण पावसाळ्यात नकळतच या सापांचा सामना होतो. अलीकडेच एका बँकेच्या एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एटीएम मशीनच्या आत साप बसलेला दिसला. आधी हा साप जमिनीवर फिरताना दिसला. मात्र काही वेळाने तो चक्क एटीएममध्येच घुसला. मशीनच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रापर्यंत पोहोचल्यानंतर सापाने आपलं शरीर त्या छिद्रामध्ये घातलं. यादरम्यान एटीएमबाहेर लोकांची गर्दी झाली होती. त्यापैकी एकाने घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक मोठा साप जमिनीवर साप रेंगाळताना दिसत आहे. मात्र, फरशीवर त्याला पुढे सरकता येत नव्हतं. त्याने काचेच्या दरवाजावरही अनेक वेळा वार केले. यानंतर हा साप लाल रंगाच्या मशीनवर चढला. सापाने मशीनच्या वरच्या भागात असलेल्या छिद्रात डोकं घातलं. मग हळूहळू संपूर्ण शरीर मशीनच्या आत घातलं . Viral Video: समोरासमोर येताच आपसात भिडले मगर आणि विशालकाय अजगर; शेवटी कोण जिंकलं? ही घटना सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाली. सुदैवाने लोकांनी वेळीच एटीएमच्या आत साप पाहिला. हा साप कोणाला दिसला नसता तर एटीएममधून कोणी पैसे काढायला जाताच सापाने त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हे पाहिल्यानंतर अनेकांनी एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. एका यूजरने लिहिलं की, एटीएमचा दरवाजा उघडला असता तर साप निघून गेला असता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या