JOIN US
मराठी बातम्या / Viral / पाण्यात सापाची शेपटी खेचायला गेला तरुण, मागून आला अजगर आणि...

पाण्यात सापाची शेपटी खेचायला गेला तरुण, मागून आला अजगर आणि...

हा व्हिडीओ आतापर्यंत 465 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर: प्राण्यांचे आणि अनेकदा सापासोबत पंगा घेतल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं मात्र सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. नुसता अजगराला पाहूनही जिथे भोवळ येते अशावेळी अजगर आपल्या मागे लागला तर काय होईल? तोंडातून शब्द फुटणार तर नाहीच पण कल्पनाच करून अंगावर शहारे येतील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हा तरुण पाण्यात असलेल्या सापाची शेपटी धरून त्याला बाहेर काढतो. साप पाण्यातून बाहेर आल्यावर या तरुणावर फुत्कारून हल्ला कऱण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा पाण्यात जातो. हा तरुण त्याच्या मागे जाणार तेवढ्यात मागून हल्ला करण्यासाठी अजगर येतो आणि तरुण पाण्यात पडतो.

संबंधित बातम्या

हे वाचा- कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड, VIDEO पाहून व्हाल हैराण हा व्हिडीओ आतापर्यंत 465 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. साडेतीन हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताना काळजाचा ठोका चुकतो अशी कमेंट एका युझरनं केली आहे. तर दुसरा युझर म्हणतो या सापानं आधीच प्लॅन केला असावा. 500 हून अधिक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या