कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणानं केला भन्नाट जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणानं केला भन्नाट जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

याआधी अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो कुकरच्या वाफेवर भाज्यांवरील विषाणू घालवत होता.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: कोरोना व्हायरसची रोजची वाढत जाणारी आकडेवारी पाहता त्याबद्दल अधिकच मनात भीती निर्माण होत आहे. कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. दोन फुटांचं अंतर, सॅनिटायझेशन आणि गरम पाणी पिणे याशिवाय वाफ घेत राहिल्यानं कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं दावा केला जात आहे.

कोरोनाव्हायरसमुळे लोक खूप काळजी घेत आहेत. बरेच महिने घरात राहिल्यानंतर लोक कामावर जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक खूप काळजी घेत आहेत. या सर्वांमध्ये लोकांना कोरोना इन्फेक्शन देखील टाळावे लागेल. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुण भाजीवरील असलेल्या विषाणू आणि किटाणूंचा नाश करण्यासाठी कुकरच्या मदतीनं वाफ देत होता. त्यानंतर आता वाफ घेण्यासाठी तरुणानं अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता व्यक्तीनं वाफ घेण्यासाठी चक्क कुकरचा जुगाड केला आहे. कुकरच्या वॉलला त्यानं एक नळी लावून त्याद्वारे वाफ घेत असल्याचं दिसत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वाफ घेणं किती महत्त्वाचं आहे ते या तरुणाच्या जुगाडातून दिसत आहे. या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

याआधी अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो कुकरच्या वाफेवर भाज्यांवरील विषाणू घालवत होता. कुकरचा जुगाड करून वाफ घेणाऱ्या या तरुणाच्या व्हिडीओला 25 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 150 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. या तरुणानं केलेल्या जुगाडासाठी नोबेल पुरस्कार द्यावा असंही काही युझर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 26, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या