प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
नवी दिल्ली, 22 एप्रिल : मुलांच्या खाण्यापिण्याबाबत पालक नेहमी चिंतेत असतात. विशेषतः बाळ ज्यांना बोलताही येत नसतं. त्यांना कधी काय हवं, काय नको ते समजत नाही. त्यांना काय खायला द्यायचं, काय नाही याचं टेन्शनही पालकांना असतं. यासाठी ते डॉक्टरांचा सल्ला देतात किंवा कुणीतरी सांगतं, कुठेतरी वाचतात त्यानुसार मुलांना खायला देतात. अशाच वाचलेल्या माहितीनुसार पालकांनी आपल्या नवजात बाळाला दररोज बर्फ खायला घातला. एका महिलेने आपल्या बाळाबाबत केलेली ही सर्वात मोठी चूक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. रेडिट या सोशल मीडियावर तिने पोस्ट केली आहे. ज्यात तिने सांगितलं की त्यांनी बेबी फू़ पोस्टर गाइडवर एक आर्टिकल वाचून आपल्या बाळाला आइसक्युब म्हणजे बर्फाचे तुकडे खायला देणं सुरू केलं.
महिला म्हणाली, आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की सातव्या महिन्यापासून मुलांना फळं, दूध, अंडी, डाळ आणि तीन-चार आइस क्युब द्या. आम्हाला हे थोडं विचित्र वाटलं. पण जिथून आम्हाला ही माहिती मिळाली ती कंपनी प्रसिद्ध होती, त्यामुळे आम्ही यावर विश्वास ठेवला. दररोज आमच्या बाळाला फळं-भाज्यांसह बर्फाचे तुकडेही भरवायला लागलो. आमच्या बाळाला हे आवडत नव्हतं तरी आम्ही त्याला अधिक बर्फ खायला देत होतो. Please, असा Teddy Bear असेल तर …; एका लेकीच्या बाबाने केली कळकळीची विनंती काही दिवसांनी महिलेची सासू त्यांच्या घरी आली. तिने बाळाला बर्फ भरवताना पाहिलं आणि तिला धक्काच बसला. ती म्हणाली, हे काय करत आहात? मुलाचा मेंदू गोठवणार आहात का? महिलेनेही सासूला मुलांना बर्फ खायला देतात, असं सांगितलं. पण तरी तिने आपल्याकडून काही चूक तर झाली नाही हे जाणून घेण्यासाठी पुन्हा ते आर्टिक वाचलं आणि ती शॉक झाली. तिने सर्वात मोठी चूक केली होती. महिला म्हणाली, अपुऱ्या झोपेत आम्ही चुकीचं वाचलं. आर्टिकलमध्ये तीन आइसक्युब इतक्या फळं-भाज्या किंवा बेबी फूड द्या असं म्हटलं होतं. आम्ही चुकून तीन आइसक्युब द्यायचं असं वाचलं. आमच्या अपुऱ्या झोपेमुळे आम्ही मोठा मूर्खपणा केला. ‘डॅड ऑफ द इअर’, लेकींच्या सुरक्षेसाठी बाबाने केलं असं काही की तुफान VIRAL होतोय VIDEO सुदैवाने बाळाला कोणती हानी झालेली नाही. पण महिलेच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत.