यूकेतील एक व्यक्ती मुलीच्या टेडी बिअरसाठी इतकी त्रस्त झाली आहे की त्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि जागोजागी पोस्टरही लावले आहेत.
या व्यक्तीच्या 4 वर्षांच्या मुलीचा टेडी बिअर हरवला आहे. त्यांनी दान केलेल्या सामानासोबत हा टेडी बिअरही गेला. आता ही व्यक्ती सगळीकडे तो टेडी बिअर शोधते आहे. पण तो कुठेच सापडत नाही आहे.
हा टेडी बिअर साधासुधा नाही तर खास आहे. टाइलर नावाच्या या व्यक्तीने सांगितलं की या टेडी बिअरचा पाय खेचल्यावर त्यातून आवाज येईल. हृदयाच्या धडधडीचा हा आवाज आहे.
टेडी बिअरमधील हृदयाची ही धडधड त्याच्या चिमुकल्या लेकीच्या मृत आईची आहे. तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या हार्ट बिटचा आवाज तिच्या आजीने या टेडी बिअरमध्ये रेकॉर्ड करून ठेवला होता.