JOIN US
मराठी बातम्या / Viral / 22 वर्षांच्या या पाकिस्तानी तरुणाला आहेत 3 बायका; ज्या नवऱ्यासाठी शोधताहेत चौथी बायको! पाहा भन्नाट VIDEO

22 वर्षांच्या या पाकिस्तानी तरुणाला आहेत 3 बायका; ज्या नवऱ्यासाठी शोधताहेत चौथी बायको! पाहा भन्नाट VIDEO

एका नव्हे चार लग्नांची एक गोष्ट : 16 व्या वर्षीच अदानचं पहिलं लग्न झालं. त्या वेळी तो शिकत होता. तीनही बायका चांगल्या आहेत आणि आपसात भांडतही नाहीत म्हणे!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 18 नोव्हेंबर : शहाण्याने लग्नाच्या बेडीत अडकू नये वगैरे सगळं ठीक आहे, पण तरीही बहुतांश लोक या बेडीत स्वखुशीने अडकतात. काही जण नंतर पस्तावतात, तर काही आयुष्यभर खूश राहतात. पण पाकिस्तानमधल्या एका तरुणाच्या लग्नाची गोष्टच वेगळी. कारण एका नव्हे चार लग्नांची ही एक गोष्ट आहे. अदनान या पाकिस्तानचा नागरिक असणाऱ्या तरुणाची ही गोष्ट टाइम्सनाऊ न्यूजने दिली आहे. 20 वर्षांचा हा अदनान तीन वेळा लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. तीनही बायका सुखाने नांदत असताना तो चौथं लग्न करायला बोहल्यावर चढणार आहे. गंमत म्हणजे आपली नवी सवत निवडण्यासाठी त्याच्या तीन बायकाच सरसावल्या आहेत. पाकिस्तानातल्या सियालकोटचे रहिवासी असलेल्या अदनान यांचा तीनही बायकांबरोबरचा एक video सध्या व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी YouTube चॅनेल डेली पाकिस्तान ग्लोबलने या अदनानची भन्नाट मुलाखत घेतली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी पहिलं लग्न केलं, असं अदनान सांगतो. त्या वेळी तो विद्यार्थीदशेत होता. अल्लाहच्या दुव्यामुळे तीनही पत्नी चांगल्या मिळाल्या, असंही तो वर सांगतो.

पाकिस्तानात बहुपत्नीत्व मान्य आहे. पण अदनानसाखे पुरुष तरीही विरळा आहेत. तीनही बायका एकत्र राहतात, आपसात अजिबात भांडत नाहीत आणि उलट माझ्यासाठी चौथी चांगली बायको शोधत आहेत. या तिघींची नावं एस् या इंग्रजी अक्षरापासून आहेत. आता चौथी बायको पण एस् वरून नाव असणारीच हवी, असंही अदनान यांनी या मुलाखतीत सांगितलं. अदनान यांना या तीन बायकांपासून पाच मुली झालेल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या