नवी दिल्ली 20 मार्च : पाकिस्तानमधील एका बिबट्याने भारतात अशी एन्ट्री केली आहे की, सोशल मीडियावर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पाकिस्तानातून भरधाव वेगात येत बिबट्याने बजरंगी भाईजान स्टाईलमध्ये काटेरी तारांखाली घुसून भारतात प्रवेश केला आहे. बिबट्याची स्टाईल इतकी वेगळी आहे की लोक त्याचं कौतुक केल्याशिवाय राहात नाहीत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर रिफ्युजी चित्रपटातील प्रसिद्ध गाणं लोकांना आठवत आहे. ‘पंछी, नदियां, पवन के झोंके…कोई सरहद न इन्हें रोके.’ रेफ्युजी चित्रपटातील हे गाणं सर्वांनी ऐकलं असेलच. ही गोष्ट खरीही आहे. पशू-पक्ष्यांसाठी कोणत्याही सीमा नसतात, ते कुठेही अगदी मुक्तपणे फिरू शकतात. इवल्याशा उंदराने केली मांजराची हवा टाईट; जीव मुठीत घेऊन पळत सुटली, पाहा मजेशीर VIDEO शनिवारी जेव्हा एका बिबट्याने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली तेव्हा लोक भावुक झाले. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सांबा जिल्ह्यातील रामगढ उप-सेक्टरमध्ये एक बिबट्या पाकिस्तानी सीमेवरून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येताना दिसला. बिबट्या जंगलात हरवला आहे.
बीएसएफने लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोकांनी बिबट्याचं स्वागत केलं आहे, तर काही लोकांनी पाकिस्तानी बिबट्या भारतातील लोकांची शिकार करू शकतो, असं म्हटलं आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलं की, ही घुसखोरी स्वागत करण्यासारखी आहे.
पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना, आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं की, ‘पाकिस्तानमधील प्राणीदेखील अन्न संकटाचा सामना करत आहेत. दुसर्या यूजरने लिहिलं की व्वा, काय स्टाईल आहे. वेलकम मिस्टर बिबट्या.