मुंबई 20 मार्च : प्राण्यांचे व्हिडिओ इंटरनेटच्या जगात खूप पसंत केले जातात. विशेषत: हा व्हिडिओ उंदीर आणि मांजराचा असेल तर तो लगेचच व्हायरल होतो. कारण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला थेट टॉम आणि जेरीची आठवण होते. उंदराला पाहताच मांजर त्याच्यावर हल्ला करून त्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतं, असं अनेकदा दिसून येतं! पण प्रत्येक वेळी असंच व्हायला हवं असं नाही. कधी अनेकदा गंगा उलटीही वाहाते आणि मांजरीची चाल तिच्यावरच उलटते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात उंदराने मांजरीची हवा टाईट केल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे, लोक मांजरांना त्यांच्या घरात ठेवतात जेणेकरून त्यांचं घर उंदरांपासून सुरक्षित राहील. परंतु हे आवश्यक नाही की प्रत्येक उंदीर मांजरीला घाबरेलच. कधीकधी मांजराचा डाव त्याच्यावर पलटतो. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये दिसलं, ज्यामध्ये एक मांजर उंदराला घाबरवत होती, परंतु तिचा पूर्ण डाव उलटला आणि उंदराने रागावून मांजरीच्या मागे धावायला सुरुवात केली. मग एक विचित्र दृश्य बघायला मिळालं, जे पाहून तुम्हाला हसू येईल.
Have you ever seen a mouse 🐁 chasing a cat 🐈!!!! pic.twitter.com/6VH2AfKsd1
— Dr Showkat Shah (@shahshowkat07) March 17, 2023
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घरातील आहे, ज्यात उंदराला पाहून एक मांजर खूप घाबरते आणि उंदीर तिच्यावर हल्ला करतो. त्यामुळे मांजर खूप घाबरते आणि स्वयंपाकघरात इकडे तिकडे पळू लागते. उंदराकडे बघून असं वाटतं की जणू काही त्याला मांजराची भीतीच नाही. या क्लिपमध्ये उंदराची हिंमत अप्रतिम आहे आणि मांजरीची अवस्था पाहून लोक खूप हसत आहेत.
@shahshowkat07 नावाच्या अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त लिहेपर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटला, तर काहींचं म्हणणं आहे की, उंदराचा राग पाहून मांजरीने योग्य निर्णय घेतला आहे.