सोर्स : गुगल
मुंबई, 20 एप्रिल : केदारनाथ हे एक महत्वाच्या तिर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे शिवाचं मंदिर आहे. जे बर्फाच्या पर्वतांमध्ये वसलेलं आहे. बॉलिवूड सिनेमामुळे लोकांना येथे येण्याचं जणू काही वेडच लागलं, शिवाय सोशल मीडिया हे दुसरं एक कारण आहे, ज्यामुळे बहुतांश लोक येथे येऊ लागले किंवा येण्याची इच्छा व्यक्त करु लागले. तरुणांसाठी तर इथे येणं हे त्यांचं स्वप्न बनलं आहे. पण तुम्हाला माहितीय का, की तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा तुम्ही येथे केदारनाथच्या दर्शनाला येऊ शकत नाही आणि आलात तरी तुम्हाला येथे दर्शन मिळणार नाही. त्यामुळे काही गोष्टी माहिती असल्याशिवाय येथे येण्याचा प्लान करुन नका. यामागचं कारण आहे येथील वातावरण. येथील थंड वातावरणामुळे हे मंदिर अनेक महिने बर्फाच्या चादरीने झाकलेले असते आणि याच कारणामुळे तुम्ही कोणत्याही महिन्यात शिवाच्या दर्शनाला येऊ शकत नाही.
मग आता प्रश्न असा उभा राहातो की हे मंदिर केव्हा खुलं असतं. चला याबद्दल जाणून घेऊ हे मंदिर प्रत्येक वर्षाच्या भाऊबीजला म्हणजे दिवाळीत बंद होतं, ते ऑक्टोबर-नव्हेंबरमध्ये बंद होते. त्यानंतर ते थेट अक्षय तृतीयाला दर्शनासाठी खुले केले जाते. म्हणजे एप्रिल महिन्यात मंदिल खुलं होतं. याचाच अर्थ हे मंदिर वर्षाचे 6 महिने बंद असतं, तर फक्त सहाच महिने भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं. अनेक वेळा हवामानानुसार ही तारीख बदलते, त्यामुळे याची माहिती इंटरनेटवर घेऊन निघनं केव्हा ही चांगलं. मंदिर खुलं होण्याची तारीख ही महाशिवरात्रीला निश्चित केली जाते. आता याच वर्षाबद्दल बोलायचं झालं तर 22 एप्रिल 2023 ला अक्षय तृतीया आहे. पण असं असलं तरी देखील केदारनाथ अजूनही बर्फाच्या जाड चादरीखाली झाकलं गेलं आहे, त्यामुळे हे मंदिर 25 एप्रिलला खुलं केलं जाईल, असं सध्या तरी सांगितलं जात आहे.