शेजाऱ्यांचं भांडण (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 22 जुलै : शेजारी शेजारी म्हटलं की काही कारणावरून वाद आलेच. अशा शेजाऱ्यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन शेजारी आपसात भांडू लागले. त्यानंतर या भांडणात एका आजोबांना इतका राग आला की त्यांनी हातात काठी घेतली आणि काठीनेच धुलाई केली आहे. दिल्लीतील ही घटना आहे. दिल्लीच्या संत नगर भागात दोन शेजाऱ्यांची भांडणं झाली. पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. शनिवारी दिल्लीच्या संत नगर भागात पार्किंगच्या वादावरून दोन शेजारी एकमेकांशी भिडले. कॉलनीच्या रस्त्यावर एका व्यक्तीने गाडी उभी केली होती, यावरून दोघांमध्ये जुंपली. वादावादी इतकी वाढली की वाद विकोपाला गेला आणि दोन्ही कुटुंबात हाणामारी सुरू झाली. दारू पिऊन बायकोला KISS करणं नवऱ्याला पडलं महागात; व्यक्तीसोबत भयंकर घडलं वादावादी इतकी वाढली की दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. शीख मध्यमवयीन व्यक्तीने हातातल्या काठीने समोरच्या व्यक्तीला जोरदार मारहाण केली, तिथे उपस्थित काही महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने संतापाने हल्ला करणं सुरूच ठेवलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला काही लोक भांडताना दिसत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती हातात हातात काठी घेते आणि दुसऱ्या व्यक्तीला मारते. दोघांचंही कुटुंब त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतं. पण काका कुणाचंच ऐकत नाहीत. महिलांनी त्या व्यक्तीला घेरलेलं असतानाही ही व्यक्ती त्यांच्यामध्ये घुसून त्या व्यक्तीवर काठीने हल्ला करत राहते.
@divya_gandotra ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.