हैदराबाद, 22 जुलै : दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारकच. पण याशिवाय दारूचे इतर वाईट परिणामही होतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती दारू प्यायली आणि बायकोला किस करायला गेली. पण दारूच्या नशेत बायकोला किस करणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. व्यक्तीसोबत असं काही भयंकर घडलं की तो आयुष्यभर विसरणार नाही. आंध्र प्रदेशमधील ही घटना आहे. कुरनूल इथं राहणारं हे दाम्पत्य . नवरा दारू प्यायला होता. त्याला रोमान्स चढला आणि बायकोसोबत तो रोमान्स करायला गेला. बायकोला त्याने दारूच्या नशेत किस केलं. पण याचा इतका भयावह परिणाम झाला की वाचूनच तुमच्या अंगावर काटा येईल. जसं या व्यक्तीने किस केलं तसं त्याच्या जिभेतून रक्त वाहू लागलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता असं या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं.
व्यक्ती जेव्हा बायकोला किस करायला गेली तेव्हा त्याच्या बायकोने तो नशेत असल्याने त्याला विरोध केला. पण नवरा काही ऐकला नाही, त्याने बायकोसोबत जबरदस्ती केली. तिला जबरदस्तीने किस केलं. मग काय बायकोला आला राग. तिने त्याची जीभच चावली. तिने त्याची जीभ आपल्या दातात तोपर्यंत दाबून ठेवली जोपर्यंत त्यातून रक्त आलं नाही. डेंजरस इश्क! गर्लफ्रेंडच्या Love Bite ने घेतला बॉयफ्रेंडचा जीव; नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL अशीच आंध्रप्रदेशमधील आणखी एक घटना. ज्यात पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. एनटीआर जिल्ह्यातील ही घटना. व्यक्तीने दुसरं लग्न केलं होतं. एकदा तो आपल्या पहिल्या बायकोचे रिल्स पाहत असल्याचं त्याच्या दुसऱ्या बायकोने पाहिलं. तिनं त्याला याबाबत विचारणा केली. त्यांच्यात वादही झाले. हे भांडण इतकं विकोपाला पोहोचलं की पत्नीला भयंकर राग आला. तिने रागात पतीचा प्रायव्हेटच ब्लेडने कापला, असं वृत्त आज तकने दिलं आहे.