नागपूर, 23 नोव्हेंबर : लहान मुलांचे केस कापणं, त्यांच्या आई-वडिलांसाठी मोठं कठीण काम ठरतं. केस कापताना मुलांनी रडून अतिशय गोंधळ घातल्याच्या अनेक गोष्टी पाहिल्या, ऐकल्या असतील. सध्या केस कापताना अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा मुलगा नागपूरचा असल्याची माहिती आहे. या मुलाला सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसवलं जातं. ज्यावेळी न्हावी त्याचे केस कापण्यास सुरुवात करतो, तेव्हा हा मुलगा जोरजोरात रडायला लागतो. अरे क्या कर रहे हो, मेरे पुरे बाल काट दोगे, अरे बाल क्यो काट रहे हो असं म्हणत तो रडतोय. त्याला शांत करण्यासाठी न्हावी त्याला त्याचं नाव, वडिलांचं नाव, आजोबाचं नाव काय असे अनेक प्रश्न विचारतोय. पण तो मुलगा प्रश्नांची उत्तर देत परत रडत, केस कापू नका असं म्हणतोय. अनुश्रुत असं त्या चिमुरड्याचं नाव आहे. केस कापताना तो जी बडबड करतोय, जे काही बोलतोय त्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून त्याचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. अनुश्रुतला केस कापायचे नाहीत. व्हिडिओमध्ये न्हावी केस कापताना त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचं, तो रडत असल्याचं स्पष्ट दिसतंय. केस कापण्यापासून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्याशी गप्पा मारत त्याला प्रश्न विचारले जातात. पण तो गुस्सा आ राहा है, तुम्हारे सारे बाल काट दुंगा, असं न्हाव्यालाच रागात म्हणतोय.
सोशल मीडियावर या गोंडस, निरागस चिमुकल्याला लोकांची चांगलीच पसंती मिळतेय. अनुश्रुतच्या वडिलांनीच त्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी, प्रत्येक आई-वडिलांना या गोष्टीचा सामना करावा लागतो असं म्हटलंय.
हा व्हिडिओ 22 नोव्हेंबरला शेअर केला असून त्याला आतापर्यंत 8 लाखहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून रिट्विटही केला आहे.