JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! भारतात दिसलं स्वर्गाचं द्वार? आकाशातील रहस्यमयी दरवाजा पाहून सर्व हैराण; अद्भुत VIDEO VIRAL

OMG! भारतात दिसलं स्वर्गाचं द्वार? आकाशातील रहस्यमयी दरवाजा पाहून सर्व हैराण; अद्भुत VIDEO VIRAL

कडेने प्रकाश असलेल्या आकाशातील हा दरवाजा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

जाहिरात

आकाशात रहस्यमयी दरवाजा (फोटो - ट्विटर)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 26 जुलै : मृत्यूनंतर कुणी स्वर्गात जातं तर कुणी नरकात. स्वर्ग, नरक कुठे आहे, कसा असतो, असा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच. सामान्यपणे फिल्ममध्ये आपण स्वर्ग, नरक कसं असू शकतं हे पाहिलं आहे. पण प्रत्यक्षात ते आहे का? आणि आहे तर कसं? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. अशात आता आकाशात असं दृश्य दिसलं आहे, ज्याला स्वर्गाचा दरवाजा म्हटलं जात आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. काळेकुट्ट ढग, आकाशात चमकणाऱ्या विजा, कधी कुठे किंचितसं ऊन आलं तर त्यातून दिसणारं इंद्रधनुष्य हे दृश्य तर आपण पाहतच असतो. पण आता आकाशात असं दृश्य दिसलं की ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आकाशात चक्क एक दरवाजा दिसला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, आकाशात काळे ढग आलेले दिसत आहेत. त्यात दरवाजाचा आकार दिसतो आहे. या दरवाजाच्या बाजूने प्रकाश येत असल्याचा दिसतो आहे. आकाशात दिसलेला हा दरवाजा नेमका कसला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. OMG! इतका स्पीड की वेगवान चित्ताही पकडू शकला नाही; कोण आहे हा प्राणी पाहा VIDEO @WazBLR ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य कर्नाटकच्या बंगळुरूमधील आकाशात दिसलं आहे. हेब्बल फ्लायओव्हरजवळ रात्री आकाशात दरवाजासारखी रहस्यमयी सावली दिसल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे अजून कुणी पाहिलं आहे का? हे काय असू शकतं? इमारतीची सावली आहे का? तसं असेल तर यामागचं शास्त्र काय असू शकतं? असे सवालही या पोस्टवर विचारवण्यात आले आहेत. Viral Video: काय सांगता! माणूस चालू लागला की थांबते आणि थांबला का वाहू लागते ही नदी? एकदा पाहाच हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. प्रत्येकाने याबाबत आपापली मतं मांडली आहेत. एका युझरने याला स्वर्गाचा दरवाजा म्हटलं आहे. तर कुणी याचा संबंध एलियन्सशी जोडला आहे. तर काहींनी ही एखादी बिल्डिंग असावी आणि तिच्यावर ढग आले असून माहून येणारा प्रकाश बिल्डिंगच्या बाजूने दिसत आहे. A mysterious shadow (object?) was seen in Bengaluru skies last night near Hebbal flyover. Did anyone else see? What could this possibly be? A shadow of a building? If it is, then what could possibly be the science behind it? Credits: @SengarAditi pic.twitter.com/8YOIzvIsPv

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटतं, आकाशात दिसणारा हा दरवाजा कसला असेल, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या  कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या