नवी दिल्ली 25 जुलै : जगात आपण कित्येक गोष्टी दररोज बघतो, मात्र तुम्हाला दिसणारी प्रत्येकच गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आहेच किंवा जसं तुम्ही पाहत आहात, तसंच ते आहे, असं नसतं. कधीकधी गोष्टी आपल्याला दिसतात त्याप्रमाणे नसतात. अशा गोष्टी एक ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच नजरेचा भ्रमदेखील असू शकतात. अलीकडे असाच गोंधळात टाकणारा एका नदीचा पाहायला मिळत आहे, ज्याला लोक अनोखी नदी समजत आहेत. या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती चालते तेव्हा ती थांबते आणि जेव्हा एखादी व्यक्ती थांबते तेव्हा नदी वाहू लागते. हा चमत्कार कसा शक्य आहे? ते पाहू याला जादू, चमत्कार किंवा कोणतीही अलौकिक गोष्ट समजू नका कारण ती फक्त नजरेला झालेला भास आहे. आपण हे ऑप्टिकल इल्यूजनच समजू शकता. @amazingsciencez या इंस्टाग्राम अकाऊंटवर विज्ञानाशी संबंधित आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक नदी वाहताना दिसत आहे. एक महिला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. ती कॅमेरा घेऊन चालायला लागली की, नदी वाहायची थांबते. जणू नदीत अचानक वाहायचं थांबल्यासारखं वाटतं. पण महिला थांबताच नदी पुन्हा वाहू लागते.
ऑप्टिकल इल्युजनमुळे हे घडत आहे. याला Parallax Effect म्हणतात. प्रत्यक्षात, आपला मेंदू अग्रभागातील वस्तूंच्या सापेक्ष गतीचं मूल्यांकन करतो. या व्हिडिओनुसार समजावून सांगायचं झालं तर, महिला कारमध्ये बसलेली दिसत आहे. गाडी धावू लागली की समोर दिसणारी बर्फाची चादर आणि लाकडी फांद्याही हालू लागल्याचं दिसू लागतं. त्या तुलनेत नदी साचलेली दिसते. पण गाडी थांबली की समोरचा अग्रभाग थांबतो आणि नदी थांबल्यासारखी वाटते. हे सहसा सामान्यपणे नेहमीच दिसून येतं, फक्त आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. खड्यांमध्ये लपलाय कोळी, त्याला फक्त 5 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार? या व्हिडिओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपला अभिप्राय दिला आहे. एकाने म्हटलं, की त्या व्यक्तीने नदीला पॉज केलं असेल. एकाने म्हटलं, की हे Relative velocity मुळे होते. तिसऱ्याने म्हटलं की तो पर्वत पाहात आहे, त्याला व्हिडिओमध्ये काय दाखवलं जात आहे हेच समजलं नाही! काही लोकांनी तर व्हिडिओलाच बनावट म्हटलं आहे.