नवी दिल्ली, 23 जुलै : वेगवान प्राणी म्हटलं की सर्वात आधी समोर येतो तो चित्ता. चित्ता वाऱ्याच्या वेगाने पळतात. काही दिवसांपूर्वी चित्त्याचा वेग दाखवणारा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा या चित्त्याच्या वेगासमोर कोणती शिकार वाचणं अशक्यच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चित्त्याच्या वेगालाही टक्कर देणारा एक प्राणी आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एक असा प्राणी ज्याचा स्पीड इतका आहे की सर्वात वेगवान प्राणी समजला जाणारा चित्ताही त्याला पकडू शकला नाही. या प्राण्यांचा कळप जंगलातून जात होता. त्याचवेळी चित्त्याची नजर त्यांच्यावर पडली. चित्ता त्यांची शिकार करायला गेला. पण या प्राण्यांनी चित्त्याला चांगलीच टक्कर दिली. हे प्राणी तर त्याच्यापेक्षाही सुपरफास्ट निघाले.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, जंगलात रस्त्याच्या मध्ये पर्यटकांची गाडी उभी आहे. त्याच्यासमोरून काही प्राणी जाताना दिसत आहेत. हे प्राणी हवेत उंच उड्या मारून पळताना दिसत आहेत. त्यांची एक उडी म्हणजे रस्त्याच्या एका किनाऱ्यावरून थेट दुसऱ्या किनाऱ्याच्याही पुढे. अगदी हवेत उडत ते पळत आहेत, असं वाटत आहे. एकएक करत सर्व प्राणी पुढे जातात आणि शेवटी तुम्ही पाहाल तर एक चित्ता दिसतो. हे प्राणी चित्त्यापासून आपला जीव वाचण्यासाठी इतक्या वेगाने पळाले. व्हिडीओच्या शेवटी पाहाल तर चित्त्याच्या तावडीत एकही प्राणी सापडल्याचा दिसला नाही. VIRAL VIDEO - तहानेनं व्याकूळ चिम्पांझीने माणसाकडे मागितली मदत; पुढे जे घडलं ते डोळ्यात पाणी आणणारं @Rainmaker1973 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा प्राणी आहे इम्पाला. इम्पाला हा शाकाहारी प्राणी आहे जो गवत, औषधी वनस्पती, झुडुपे खाऊन जगतो. त्याला दररोज पाणी पिण्याची गरज असते आणि दिवसाच्या सर्वात उष्ण भागात, जेव्हा शिकारी कमी सक्रिय असतात तेव्हा ते अनेकदा जलकुंभांना भेट देतात. इम्पाला गटात राहतात. हंगाम आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. पावसाळ्यात जेव्हा पुरेशा प्रमाणात गवत म्हणजेच अन्न उपलब्ध असते तेव्हा 100 पर्यंत इम्पाला एकत्र राहू शकतात. कोरड्या हंगामात ते लहान गटांमध्ये विभागले जातात. Viral Video : पाण्यात पाय टाकून बसला होता व्यक्ती; इतक्यात मगर आली अन्…, काय केलं पाहा व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार ते 3 मीटर उंच आणि 10 मीटर लांब उडी मारू शकतात. त्यांचा वेग ताशी 90 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. चित्त्यांनी पाठलाग केल्यावर ते अक्षरशः उडतात यात आश्चर्य नाही. हा व्हिडीओ सामंथा पिटेंड्रिघने टिपला आहे.
Built for running and jumping, the Impala is able to make jumps that are more than 10 m long and 3 m high. It can reach peaks of speed of 90 km/h.
— Massimo (@Rainmaker1973) July 22, 2023
No surprise that they seem to literally fly when chased by a cheetah
[📹 Samantha Pittendrigh]pic.twitter.com/nenR4qB4bV
या व्हिडीओवर कमेंट करताना एका युझरने यांच्याबाबत अधिक माहिती दिली आहे. शिकारींचे लक्ष विचलित करण्यासाठी झिगझॅग चालवू शकतात. तसंच ते सुमारे 50 किलोमीटरपर्यंत खूप लांब पल्ले धावण्यास सक्षम आहे. एवढ्या अंतरावर इतर कोणताही प्राणी एकाच वेळी जाऊ शकत नाही. काहींनी यांचा वेग पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. “खरं तर प्राणी असो की माणूस, जेव्हा आपल्या जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा आपल्याजवळ जी काही अनपेक्षित शक्ती असते, तिचा स्फोट होतो. पण हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे.”, असं म्हटलं आहे.