JOIN US
मराठी बातम्या / Viral / श्वानाला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी; इतक्यात अचानक ट्रेन आली अन्...पाहा VIDEO

श्वानाला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली रेल्वे ट्रॅकवर उडी; इतक्यात अचानक ट्रेन आली अन्...पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका श्वानाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवताना दिसतो. यादरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उभे असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 फेब्रुवारी : मुंबई ही लाखो लोकांच्या स्वप्नांची नगरी आहे. या शहराने अनेक लोकांची यशोगाथा लिहिली, लाखो लोकांना अतिशय यशस्वी करत, मोठ्या स्थानावर पोहोचवलं. जगप्रसिद्ध चित्रपट उद्योगापासून ते काही यशस्वी उद्योजकांपर्यंत या मायानगरीत अगदी सगळं काही आहे. मुंबईत दररोज अनेकजण आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी देखील म्हटलं जातं. तसं तर सोशल मीडियावर मुंबईतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. श्वानांच्या लग्नाचा शाही थाट! लग्नात नाचायला बार डान्सर्स, 3 दिवस सुट्टी, 50 हजार लोकांना 3 वेळा जेवण यातील काही व्हिडिओ मन जिंकून जातात तर काही विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही छोटी व्हिडिओ क्लिप @Madan_Chikna नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका श्वानाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवताना दिसतो.

संबंधित बातम्या

यादरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उभे असतात. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1.8 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे, तर 10 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. मुंबईला आपल्या फास्ट लाईफस्टाईलसाठी आणि नाइटलाइफसाठी ओळखलं जातं. याच कारणामुळे याला ‘city that never sleeps’ असं नावही दिलं गेलं आहे. मात्र अनेकदा धावपळीच्या आणि कामाच्या व्यापात असलेल्या या मुंबईकरांचा वेगळा चेहराही पाहायला मिळतो, हेच दाखवणारा हा व्हायरल व्हिडिओ आहे. …जेव्हा वाघाला घाबरून पर्यटक ओरडले ‘हाड हाड’; पुढे काय घडलं पाहा VIDEO असा दावा केला जात आहे, की व्हायरल होणारा हा व्हिडिओ मुंबईचा आहे. क्लिपमध्ये एक श्वान रेल्वे ट्रॅकवर दिसत आहे. एक व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यानच ट्रेन ट्रॅकवर येते. मात्र सुदैवाने ट्रेनचं स्पीड कमी असतं. युवक श्वानाला वाचवतो आणि मग त्याला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवतो. यानंतर तो स्वतःही प्लॅटफॉर्मवर चढतो. तरुणाच्या या कृत्यानं नेटकऱ्यांचं मन जिंकलं असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या