जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...जेव्हा वाघाला घाबरून पर्यटक ओरडले 'हाड हाड'; पुढे काय घडलं पाहा VIDEO

...जेव्हा वाघाला घाबरून पर्यटक ओरडले 'हाड हाड'; पुढे काय घडलं पाहा VIDEO

वाघाचा व्हिडीओ.

वाघाचा व्हिडीओ.

श्वान आणि मांजराला हाकलावं तसं पर्यटकांनी वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी :  सामान्यपणे श्वान किंवा मांजर समोर आलं, तर अशा प्राण्यांना हाकलवण्यासाठी आपण हाड हाड किंवा हाट हाट असं म्हणतो. ते ऐकताच श्वान किंवा मांजर घाबरून पळून जातं. पण हाच शब्द वाघासमोर वापरला तर काय होईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका वाघाला काही लोकांनी हाड हाड केलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. एका जंगलात काही पर्यटक गेले. ते सर्वजण गाडीत होते. एका ठिकाणी ते थांबले असता अचानक झाडांमधून एक वाघ आला. तो या पर्यटकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पर्यटकांवर तो शिकारीसाठी धावत आला. डरकाळी फोडत त्याने पर्यटकांवर झेप घेतली पण त्याचवेळी गाडीतील पर्यटक हाड हाड असे ओरडले. आता कुत्रा, मांजरांना हाकलावं तसं वाघाला हाकललं तर काय होईल बरं… विचार करा जरा. वाघालाही जमलं नाही ते ‘वाघाच्या मावशी’ने करून दाखवलं; मांजर-मगरीचा लय डेंजर VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहिलं तर जसे पर्यटक वाघाला हाड हाड बोलले तसा वाघही घाबरला आणि तो आला तसाच परत पळून गेला.

News18लोकमत
News18लोकमत

हॅलो ऑन नागपूर सिटी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. जेव्हा नागपूरकर व्हिजिट ताडोबा असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. पण व्हिडीओ नेमका तिथलाच आहे याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. हा VIDEO पाहून खतरनाक सिंहही वाटेल ‘बिच्चारा’; शिकारीला आलेल्या जंगलाच्या राजाची रेड्याने अशी लावली वाट वाघाला अशा पद्धतीने हाकलवण्याचा प्रयत्न, त्यानंतर पळालेला वाघ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत. वाघाचा तर यांनी श्वान करून टाकला अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एका युझरने तो हाड हाड शब्दाला नाही, तर सर्वजण एकत्र इतक्या मोठ्याने ओरडला त्यामुळे घाबरला, असं म्हटलं आहे.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात