JOIN US
मराठी बातम्या / Viral / दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद

दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद

गाडी टो करण्याच्या प्रकाराचा वापर करत या चोरांनी दिवसाढवळ्या बाईक चोरली. त्यांचं सगळं वागणं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : चोरीच्या घटना मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना मालवणी परिसरातून समोर आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीजवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरांनी बाईकची चोरी केली आहे. ते इतक्या हुशारीने बाईकची चोरी करत आहेत की ते पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तुम्ही रस्त्यावरुन अनेक लोकांना टूव्हिलरला टो करताना पाहिलं असेल, म्हणेजच काय तर गाडीत एखादा बिघाड झाला किंवा मग पेट्रोल संपलेलं असेल तर अशा गाडीला दुसऱ्या गाडीच्या सह्याने मागून ढगललं जातं. यामध्ये खराब झालेले गाडी पुढे असते आणि मागून जी गाडी सुरु असते, त्या गाडीचा चालक पाय लावून ढकलत असतो. मुंबईतील अशी ‘ही’ 5 ठिकाणं, जिथे एकटं जाण्याची चुक कोणीही करत नाही अगदीच याच प्रकाराचा वापर करत या चोरांनी दिवसाढवळ्या बाईक चोरली. त्यांचं सगळं वागणं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. आधी दुचाकीवरून ३ तरुण आले. मग त्यापैकी एक तरुण उतरला आणि इकडे तिकडे फिरु लागला. तेव्हा बाईक चालक पुढे निघून गेले आणि युटर्न मारुन पुन्हा आले. तेव्हा या ३ तरुणांमध्ये पुन्हा काही बोलणं झालं. त्यानंतर तो तरुण पुढे एका एक्टिवाजवळ गेला. त्या गाडीवर तो बसला, तेव्हा मागून हे दोन तरुण आपल्या दुचाकीवरुन आले आणि गाडीला टो करु लागले. त्यांनी या ट्रीकने गाडी चोरी केली. ते ही सगळ्या लोकांसमोर.

संबंधित बातम्या

हा सगळा प्रकार मालवणीतील म्हाडा सोसायटीमध्ये घडला आहे. ही घटना १२ मार्च रविवारी घडली. या प्रकरणात मुंबई पोलीसांचा तपास सुरु आहे. चोरांचा चेहरा तर स्पष्ट दिसत आहे. याच जोरावर पोलीस लवकरच चोरांना पकडतील.

चोर हुशार झालेत यात काही शंका नाही, ते नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या आणत असतात. पण आपल्याला आता सतर्क राहण्याची गरज आहे. हा प्रकार घडल्यानंतर गाडीचं हॅन्डल लॉक करण्याची किती गरज आहे, हे लक्षात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या