JOIN US
मराठी बातम्या / Viral / मायलेकीच्या 'पती स्पेशल' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; एकदा पाहाच हा जबरदस्त VIDEO

मायलेकीच्या 'पती स्पेशल' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; एकदा पाहाच हा जबरदस्त VIDEO

मायलेकीचं हे पती स्पेशल गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

जाहिरात

मायलेकीचं पती स्पेशल गाणं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 एप्रिल : गाणं ऐकायला कुणाला आवडत नाही. तुम्ही बरीच गाणी ऐकली असतील पण कधी पती स्पेशल गाणं ऐकलं आहे का? पती स्पेशल गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मायलेकीने हे पती स्पेशल गाणं गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तुम्हीही कदाचित हा व्हिडीओ पाहिला असेल आणि नसेल तर आम्ही हा व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आई आणि मुलीचे सोशल मीडियावर तसे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका मायलेकीच्या जोडीने कमाल केली आहे. सोशल मीडियावर एकत्र गाणाऱ्या या मायलेकी. ज्यांनी चक्क पतीवर गाणं तयार केलं आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे . पोस्टमध्ये या गाण्याला मोस्ट डिमांड केलेलं गाणं म्हणण्यात आलं आहे.  असं या व्हिडीओत आहे तरी काय पाहुयात.

geeton_ki_sargam या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये या गाण्याला मोस्ट डिमांड केलेलं गाणं म्हणण्यात आलं आहे. बाई बाई बाई! या बायकांच्या हौसेला तोडच नाही; विचित्र शौक असलेल्या 5 महिला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन महिला दिसत आहे. समोर ड्रेसमध्ये बसलेली मुलगी आणि तिच्या मागे साडी नेसून बसलेली तिची आई आहे. मुलीने आपल्या हातात ढोलकी घेतली आहे. मुलगी ढोलकी वाजवत गाणं गातं आहे आणि तिची आईही तिला साथ देते आहे. ‘बन्ना बीटेक एमटेक पास, बन्नी मिली अंगुठा छप’ असं हे गाणं आहे. सुशिक्षित नवऱ्याची अडाणी बायको आणि त्यांच्या संसार कसा आहे, हे या गाण्यातून मजेशीर पद्धतीने सांगण्यात आलं आहे. Weird : महिलेचं असं नाव, जे सांगताच लोकांना बसत नाही विश्वास, ओळखपत्र दाखवून पटवते ओळख या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा व्हिडीओ इतका आवडला की त्यांना व्वा शानदार, ही रिल नक्कीच ब्लॉकबस्टर ठरणार, असं म्हटलं आहे. तर काही युझर्सनी या गाण्यात आपापल्या परीने गकाही ओळी अॅड केल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हे पती स्पेशल गाणं कसं वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या