ह्युमन बार्बी डॉल - लॉस एंजिलिसमध्ये राहणारी 30 वर्षांची ओफेलिया वॅनिटीने ह्युमन बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी तब्बल 22 लाख रुपये खर्च केले. तिने 40 पेक्षा जास्त सर्जरी केल्यात, चेहऱ्यावर कित्येक इंजेक्शन घेतलेत.
अमेरिकेतील डायनाच्या दोन्ही हातांच्या नखांचा सर्वात लांब असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. गिनीज बुकच्या मते, 25 वर्षांपासून तिने नखं कापली नाहीत. तिच्या नखांची लांबी 42 फीट 10 इंच आहे. तिची मुलगी नखं कापायची, तिच्या मृत्यूनंतर तिने नखं कापलीच नाहीत.
कन्सासमध्ये राहणारी लिंसे लिंडबर्गने आपल्या बायसेपने एका मिनिटात 10 सफरचंद फोडले. सर्वात मजबूत महिला म्हणून तिने किताब जिंकला आहे. एका मिनिटात 5 गठ्ठे पत्ते फाडण्यााचही तिचा रेकॉर्ड आहे. तिने लोखंडी तवाही हाताने मोडला आहे.
पोलंडची नतालिया पार्त्यका एक प्रसिद्ध टेनिस प्लेअर आहे. पण ती इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. तिचा उजवा हात कोपरापासून नाही. पण हातांशिवाय तिने ओलम्पिक होल्ड मेडल आपल्या नावे केलं आहे. टोकियो पॅरालिम्पिक्समध्येही तिने आपली जादू दाखवली.
अमेरिकेत राहणारी 35 वर्षांची अलिशा यंग जिच्या नावे जगातील सर्वात स्ट्राँग बॉडी असण्याचा रेकॉर्ड आहे. याच वयात तिने कित्येक बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या आहेत. तिचे वडील एक प्रसिद्ध रेसलर होते. त्यामुळे तिलाही यात आवड निर्माण झाली.