JOIN US
मराठी बातम्या / Viral / कधी कैद्यांवर कुत्र्याची उल्टी तर कधी रेप; इतिहासातील सर्वात क्रुर महिलेबद्दल तुम्हाला माहितीय का?

कधी कैद्यांवर कुत्र्याची उल्टी तर कधी रेप; इतिहासातील सर्वात क्रुर महिलेबद्दल तुम्हाला माहितीय का?

हिटलरच नाही तर त्याच्या काळातील आणखी काही व्यक्ती आहे, जे हिटलर एवढेच क्रुर आहेत. हो, हे खरं आहे आणि हे लोक नाझी गाटातील होते.

जाहिरात

सोर्स : Google

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : हिटलरबद्दल कोणाला माहिती नाही? तो एक हिंसक शासक होता. तसेच तो सर्वात धोकादायक पुरुषांपैकी एक होता. ज्यामुळे त्याच्याबद्दल सर्वत्र बोललं जातं. अनेक पुस्तकात देखील त्याच्याबद्दल लिहिलं गेलं आहे. त्याने लोकांवर इतके अत्याचार केले होते की त्याच्याबद्दल ऐकून अनेक लोक हळहळ व्यक्त करतात. पण तुम्हाला माहितीय का की हिटलरच नाही तर त्याच्या काळातील आणखी काही व्यक्ती आहे, जे हिटलर एवढेच क्रुर आहेत. हो, हे खरं आहे आणि हे लोक नाझी गाटातील होते. नाझी गटातील लोक हिटलरला साथ देणारे होते. यात जगातील सर्वात क्रूर महिलेचा देखील समावेश आहे.तिच्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? चला या नाझी महिला सैनिकाबद्दल जाणून घेऊ. Weird Rituals : इथे लग्नानंतर आपल्याच मुलीवर थुंकतो बाप, यामागचं कारण जाणून बसेल धक्का या नाझी महिलेनं अगदी लहान वयातच क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या कारणास्तव तिला ‘हायना ऑफ ऑशविट्झ’ किंवा ‘ब्युटीफुल बीस्ट’ म्हणून ओळखले जाते. या ग्रीस महिलेचं नाव आहे इर्मा ग्रीस. सोर्स : Google

सोर्स : Google

इर्माचा जन्म 1923 मध्ये झाला आणि ती 13 वर्षांची असतानाच तिच्या आईने आत्महत्या केली. इर्माच्या वडिलांचे दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर असल्याचे आईला समजले होते, ज्यामुळे तिने आत्महत्या केली. इर्माचे बालपण कठीण होते. शाळेत तिचा खूप छळ झाला पण त्याला उत्तर देण्याची तिची अजिबात हिंमत नव्हती. यामुळे तिने लहानपणीच शाळेत जाणं बंद केलं. पैसे कमवण्यासाठी तिने काही काळ शेतात काम केलं आणि नंतर दुकानात काम करायला सुरुवात केली. नाल्यातून सापडलेल्या ‘या’ 10 विचित्र गोष्टी, ज्याबद्दल ऐकून विश्वास ठेवणं होईल कठीण! वयाच्या १९ व्या वर्षी नाझी सैनिक जेव्हा ती 19 वर्षांची झाली तेव्हा तिला हिटलरची तत्त्वे इतकी आवडली की, ती नाझी सैन्यात सामील झाली. तिला रेवेन्सब्रक एकाग्रता शिबिरात रक्षक म्हणून तैनात केले होते. जिथे ती महिला कैद्यांवर देखरेख करत असे. एक वर्षानंतर, 1943 मध्ये, ग्रीसने नाझींच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात कुप्रसिद् छावणीत, ऑशविट्झ येथे पाठवण्यात आले. तिचे क्रुर काम पाहून सर्वजण तिच्यावर खूश झाले, म्हणून तिला वरिष्ठ पर्यवेक्षक या पदावर बढती देऊन तेथे पाठवले. नाझींच्या राजवटीत स्त्रियांना दिले जाणारे हे दुसरे सर्वोच्च पद होते. एवढी ताकद मिळताच इर्माने तिचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या