या विश्रामगृहाने गेल्या अनेक वर्षांचा राजकीय इतिहास जपला आहे.
कासिम खान, प्रतिनिधी नूह, 11 जून : हरियाणात अनेक सरकारी विश्रामगृह आहेत. मात्र नूह जिल्ह्यातील तावडू येथे असलेल्या ‘मोरपंख’ विश्रामगृहाची गोष्ट तर काही औरच आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या विश्रामगृहाच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत. या झाडांच्या सावलीत अनेक सुंदर पक्षी विसावा घेताना दिसतात. मुख्यतः मोर. ते सावलीत छान खेळतात, थुईथुई नाचतात आणि पंखांच्या रूपात प्रत्येक जागी आपली छाप सोडतात. ठिकठिकाणी त्यांची पंख पडलेली दिसल्यानेच या विश्रामगृहाला मोरपंख असं नाव पडलं. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना आणीबाणीच्या काळात 19 महिने याच विश्रामगृहाच्या आवारात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांचं या जागेशी एक घट्ट नातं तयार झालं. त्याचबरोबर याठिकाणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या बऱ्याचदा राजकीय बैठकीसाठी येत असत, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, आणीबाणीनंतर जेव्हा मोरारजी देसाई यांना पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला, तेव्हा 3 ऑक्टोबर 1977 रोजी त्यांनीच या विश्रामगृहाचं बांधकाम केलं.
जवळपास 7-8 एकर जमिनीवर वसलेल्या या विश्रामगृहाने गेल्या अनेक वर्षांचा राजकीय इतिहास जपला आहे. सध्या त्याच्या देखभालीची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे आहे. परंतु त्याची हवी तशी देखभाल होत नसल्याने आणि आता बांधकामानंतर बरीच वर्ष लोटल्याने त्याचं तेज कमी झालं आहे. Monsoon Update : प्रतिक्षा संपली अखेर राज्यात मान्सूनचं आगमन! विशेष म्हणजे सरकारने याची दखल घेतली असून या सुंदर वास्तूची झालेली दयनीय अवस्था पाहून तिचा कायापालट करण्याचा दावा केला आहे. आमदार संजय सिंग यांनी तब्बल 16 लाख रुपये खर्चून या विश्रामगृहाचं सौंदर्य पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास जनतेला दिला आहे. त्यामुळे आता या विश्रामगृहाचं रूप लवकरच पुन्हा पहिल्यासारखं पालटणार, अशी आशा आहे.