पुणे, 11 जानेवारी : मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनं व्यापला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
🔊SW Monsoon in #Maharashtra today on 11 Jun
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
नैऋत्य मान्सूनचे आज 11 जून ला #महाराष्ट्रात आगमन.दक्षिण कोकणातील काही भाग,द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग,संपूर्ण गोवा,कर्नाटकचा व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग व्यापला.
NLM:रत्नागिरी,शिमोगा,हसन,धरमपुरी,श्रीहरीकोटा ... दुभरी
- IMD pic.twitter.com/gz9U93jbOJ
पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र त्याआधीच आज मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे. महाराष्ट्रात प्रमाणेच संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात देखील मान्सूनचं आगमन झालं आहे. मात्र संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे पोषक स्थिती दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहिल. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र दोन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे.