JOIN US
मराठी बातम्या / Viral / हे भलतच आहे! या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून-रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO

हे भलतच आहे! या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून-रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO

द डे ऑफ द डेड हा मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी एक रडण्याची स्पर्धाही ठेवली जाते. स्पर्धेत सर्वाधिक रडणाऱ्या व्यक्तीला बक्षिस दिलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेक्सिको, 6 नोव्हेंबर : मेक्सिकोमध्ये (Mexico) दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी द डे ऑफ द डेड (Day of Dead) सण साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जातात. त्याला सजवतात, मृत्यू झालेल्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन जातात. हा मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी एक रडण्याची स्पर्धाही ठेवली जाते. स्पर्धेत सर्वाधिक रडणाऱ्या व्यक्तीला बक्षिस दिलं जातं. कोरोनामुळे मेक्सिकोमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे यावर्षी संपूर्ण कब्रस्तान सणासाठी बंद आहेत. NYT च्या रिपोर्टनुसार, यावर्षी डे ऑफ द डेड दिवशी सार्वजनिक उत्सवांवर बंदी आहे. कोणीही हा सण साजरा करण्यासाठी कब्रस्तानमध्ये गेलं नाही. परंतु सॅन जुआन डेल रियो शहरात दरवर्षी होणारी रडण्याची स्पर्धा यावर्षीही झाली. पण ही स्पर्धा यंदा ऑनलाईन घेण्यात आली. लोकांनी स्पर्धेसाठी 2-2 मिनिटांचे रडण्याचे व्हिडिओ पाठवले होते.

(वाचा -  78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच… )

रडण्याची अजब स्पर्धा - दरवर्षी या स्पर्धेत लाईव्ह परफॉर्म करावं लागतं. पण यावर्षी व्हर्च्युअल स्पर्धेत आश्चर्यकारक, दरवर्षीपेक्षा दुप्पट एंट्रीज आल्या होत्या. सर्वश्रेष्ठ रडणारा निवडण्याची परंपरा येथील, प्राचीन परंपरेचा भाग आहे, ज्यात एखाद्याच्या मृत्यूनंतर रडण्यासाठी भाडेतत्त्वावर महिलांना बोलवण्यात येत होतं. रडण्याच्या या स्पर्धेचा पहिला अवॉर्ड कॅलिफोर्नियाच्या प्रिंसेसा कॅटलीना चावेजने जिंकला. अभिनेत्री असलेल्या चावेजने, कोरोनाने मला रडण्यास मजबूर केल्याचं यावेळी सांगितलं.

(वाचा -  भारीच!60 सेकंदात इतके पुलअप्स मारून रचला वर्ल्ड रेकॉर्ड,वाचून विश्वास बसणार नाही )

टूरिझम ब्युरोचे प्रमुख एजुआर्दो गुइलेन यांनी सांगितलं की, एखाद्याच्या मृत्यूवर रडणंच नाही, तर हसणंही मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग आहे. ही समस्येचा सामना करण्याची एक पद्धत आहे. या स्पर्धेसाठी आलेले रडण्याचे विचित्र, अजब व्हिडिओ पाहून, पॅनलवर असलेल्या जजने, पुढील वर्षी रडण्याच्या स्पर्धेत पुरुषही भाग घेऊ शकतील, अशी घोषणा यावेळी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या