JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईच्या गावात अन बाराच्या भावात! तोंड-डोळे-कान-नाक असलेला 'आंबा'; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा

आईच्या गावात अन बाराच्या भावात! तोंड-डोळे-कान-नाक असलेला 'आंबा'; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा

चेहरा असलेल्या आंब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

चेहरा असलेल्या आंब्याचा व्हिडीओ व्हायरल (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जून : हापूस, रायवळ, तोतापुरी असे एक ना दोन आंब्याचे कितीतरी प्रकार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तुम्हाला माहिती असतील, तुम्ही पाहिले असतील आणि खाल्लेही असतील. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र आंब्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या आंब्याला चक्क डोळे-तोंड-नाक-कान आहे. या आंब्याला पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. शाळेत लहानपणी तुम्ही कदाचित चित्रात असा चेहरा असलेला आंबा काढला असेल. पण प्रत्यक्षात कधी असा आंबा पाहिला तरी आहे का? हा असा आंबा पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंच असा आंबा आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमका हा आंबा आहे तरी काय? आणि कसा ते पाहण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. चला तर मग पाहुयात हा अनोखा आंबा. एका ट्विटवर डोळे-तोंड-कान-नाक असलेल्या या आंब्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हापूससारखाच पिवळाधम्मक हा आंबा पाण्यात तरंगताना दिसला. एका व्यक्तीने हा आंबा उचलला आणि त्याला पाहताच क्षणी सर्व थक्क झाले. कधी खाल्ला आहे का हा काळा आंबा? आतून कसा असतो VIDEO पाहा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पाण्यात आंबा दिसतो आहे. हा आंबा पाण्यात फक्त पडला नाही तर तो तरंगतो आहे. जणू काही त्या आंब्यात जीव आहे. एक व्यक्ती त्या आंब्यााल पाहतो आणि तो हातांनी उतरते. पाण्याबाहेर काढताच आंब्याला तुम्ही नीट पाहिलं तर त्याला तोंड आहे, कान आहे, नाक आहे आणि डोळेही आहेत. ज्याची हालचाल होते आहे. पण खरंतर हा आंबा नाही तर एक मासा आहे. हा पफर फिश आहे. हा असा मासा आहे. जो स्वतःच्या शरीरात पाणी भरून आपलं शरीर फुग्यासारखं फुगवतो. त्याच्याकडे स्वरक्षणाची असलेली ही एक क्षमता आहे. या पफर फिशचा रंग आणि आकार असा आहे की जणू तो आंबाच वाटतो आहे. या पिवळ्या रंगाच्या पफर पिशला गोल्डन पफर फिश म्हणतात. व्यक्ती हटके स्टाईलमध्ये विकतेय आंबे, Video पाहून आवरणार नाही हसू हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युझरने त्याला पाण्यात तरंगणारा आंबा म्हटलं आहे. दुसऱ्या युझरने तर त्याला सी मँगो म्हणून नावच दिलं आहे.

संबंधित बातम्या

ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या