नवी दिल्ली, 18 जून : सोशल मीडियावर रोज नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. कधी कोण काय करेल काही सांगता येत नाही. खास करुन विक्रेते आपला माल विकण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढतात. ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी ते प्रत्येक वेळी काहीतरी अनोखं करताना दिसतात. सोशल मीडियावर विक्रेत्यांचे एकपेक्षा एक हटके व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एका विक्रेत्याचा आंबे विकताना व्हिडीओ समोर आलाय. त्याची स्टाईल पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही आंबे विकणाऱ्या अनेक लोकांना आत्तापर्यंत पाहिलं असेल. असे वेगवेगळ्या आणि अनोख्या शैलीने ते आंबे विकण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्यक्तीचा हटके स्वॅग पाहून तुम्हीही चाट पडाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीची आंबे विकण्याची पद्धत सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक दुकानदार आंब्यांनी भरलेल्या गाडीसमोर उभा राहून त्यांची विक्री करताना दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तो शकीराचे वाका-वाका गाणे त्याच्याच शैलीत गाताना दिसतो. आता आंबा कितीही का असेना, पण एखाद्या व्यक्तीचे हे गाणे ऐकल्यानंतर त्याच्याकडे एक ग्राहक नक्कीच येईल. hamzachoudharyofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यासाठी 97 हजारांहून अधिक लोकांनी या बातमीला लाईक केले असून त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खरंच हा माणूस व्यवसायात खूप क्रिएटिव्ह आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘वाह! शकीराची देसी आवृत्ती. आणखी एका युजरने लिहिले, याला आंबे विकण्याची निंजा टेक्निक म्हणतात.
दरम्यान, आजच्या काळात ग्राहकांना आकर्षित करणं सोपं काम नाही. लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देऊन त्यांच्याकडे आकर्षित करावं लागतं. आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लोक हटके आयडिया घेऊन येत असतात. सध्या हा आंबे विकणारा व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.