जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कधी खाल्ला आहे का हा काळा आंबा? आतून कसा असतो VIDEO पाहा

कधी खाल्ला आहे का हा काळा आंबा? आतून कसा असतो VIDEO पाहा

काळा आंबा (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

काळा आंबा (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

काळ्या आंब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जून :  आंबा म्हटलं की पिवळंधम्मक किंवा केशरी रंगाचं फळ समोर येतं आणि केशरी किंवा पिवळा रंग म्हटला की सर्वात आधी आंबाच समोर येतो. आंबा आणि पिवळा किंवा केशरी रंग हे समीकरणच आहे. पण तुम्ही कधी काळा आंबा पाहिला आहे का? आंबा आणि काळा… तुम्हाला हसूच येईल. किंबहुना असा आंबा असू शकतो, यावर विश्वाच बसणार नाही. पण अशाच काळ्या आंब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आंब्याचे अनेक प्रकार आहेत. कित्येक प्रजातीचे, चवीचे आंबे आहेत. आंब्याच्या रंगात तसा थोडाफार फरक असतो. पण तो पिवळा, केशरी या रंगाच्या पट्ट्यातीलच असतो. आता अगदी हे रंग सोडून थेट काळा आंबा म्हटलं तर कुणालाही आश्चर्य वाटणारच. पण खरंच असा आंबा आहे, जो  कोळशासारखा काळा कुळकुळीत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काळ्या आंब्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. असा आंबा असूच शकत नाही, असं तुम्ही म्हणाल. व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. मे महिनाच कशाला, वर्षभर आंबे खायला मिळतील; एकदा हा VIDEO पाहाच व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीच्या हातात काळ्या रंगाची वस्तू आहे. सुरुवातीला हे दुसरं कोणतं तरी एखादं फळ किंवा भाजी असावी असं वाटतं. पण जेव्हा ते कापलं जातं, तेव्हा बाहेरून काळा कुळकुळीत असलेला हा पदार्थ आतून मात्र पिवळाधम्मक असल्याचं दिसतं. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा काळा आंबा आहे. अनेकांचा यावर विश्वासच बसत नाही आहे. या आंब्याला कलर केला असावा, अशी कमेंट काहींनी केली आहे. तर काहींनी असा आंबा असतो या याचा शोधही घेतला. बाबो! 4.5 लाख रुपयांचा एक कलिंगड; असं यात काय आहे खास पाहा PHOTO खरंच हा आंबा काळा आहे. जमैकामध्ये असे आंबे सामान्य आहेत. यांना ब्लॅकी मँगो म्हणतात. काळा रंग असल्यांनं या आंब्याला असं नाव पडलं आहे.

जाहिरात

तुम्हाला हा काळा आंबा कसा वाटला? तुम्ही प्रत्यक्षात हा आंबा पाहिला आहे का? खाल्ला आहे का? याच्याबाबत आणखी काही तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात