JOIN US
मराठी बातम्या / Viral / विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणाने लावला, ट्राफीक पोलिसांपासून वाचण्याचा जुगाड, पाहा Video

विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणाने लावला, ट्राफीक पोलिसांपासून वाचण्याचा जुगाड, पाहा Video

हा व्हायरल व्हिडीओमधील तरुणाकडे हेल्मेट नाही, तसेच रस्त्यात पोलीस उभे आहेत, ज्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी या तरुणाने एक जुगाड केला.

जाहिरात

पोलिसांपासून वाचण्यासाठी तरुणाची युक्ती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी एक भन्नाट युक्ती लावली, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ज्यामुळे नेटकरी देखील त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाहीत. भारतीयांसाठी जुगाड काही तसा नवीन नाही, पण चलान कापलं जाऊ नये यासाठी मात्र या तरुणाने जो जुगाड केला. तो क्वचितच कोणी पाहिला असेल. 9 सेकंदात मृत्यूचा तांडव, बाईक स्टंट करताना एक चुक आणि… पाहा Video हा व्हायरल व्हिडीओमधील तरुणाकडे हेल्मेट नाही, तसेच रस्त्यात पोलीस उभे आहेत, ज्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी या तरुणाने एक जुगाड केला. तो दुचाकीवरुन उतरला आणि तिला धक्का मारु लागला. ज्यामुळे पोलिसांनी देखील त्याला पकडले नाही. जेव्हा हा तरुण आपली गाडी घेऊन पोलिसांपासून पुढे निघून आला, तेव्हा त्याने आपली गाडी चालू केली आणि तेथून पळून गेला.

संबंधित बातम्या

या तरुणाला एका दुसऱ्या बाईक वाल्याने मदतीसाठी विचारले, पण थोड्याच वेळात त्याच्या देखील लक्षात आले की हा तरुण काय करु पाहात आहे. हा संपूर्ण प्रकार दुसऱ्या बाईकवाल्याच्या हेल्मेटमध्ये असलेल्या कॅमेरात शुट झाला, जो नंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

या तरुणाचा हा जुगाड पाहून नेटकरी देखील आवाक् झाले. अनेकांनी तर हे मान्य देखील केलं आहे की भारतीयांच्या जुगाडसमोर सगळेच अपयशी आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्राम हँडल leki_goswami01 ने पोस्ट केला आहे, जो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला जात आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखोवेळा पाहिले गेले आहे. हा खरा जुगाड असल्याचे काहींनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या