JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाने वाचवला जखमी पक्षाचा जीव; परतफेड म्हणून पक्षाने जे केलं ते मन जिंकणारं, पाहा VIDEO

तरुणाने वाचवला जखमी पक्षाचा जीव; परतफेड म्हणून पक्षाने जे केलं ते मन जिंकणारं, पाहा VIDEO

मैत्रीची एक नवी आणि अनोखी बातमी आता समोर आली आहे. यात एका व्यक्तीची अशा एका जिवासोबत मैत्री झाली, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 मार्च : खरी मैत्री ही सर्वोत्तम मानली जाते, जी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असते. आपल्यापैकी बहुतेकांचे अनेक मित्र असतात. अनेकदा आपण माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या कथाही ऐकतो. मात्र यात कुत्रा, मांजर आणि पोपट यांच्यासोबतच्याच मैत्रिणीच्या जास्त कथा असतात. पण मैत्रीची एक नवी आणि अनोखी बातमी आता समोर आली आहे. यात एका व्यक्तीची अशा एका जिवासोबत मैत्री झाली, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. VIDEO: जेव्हा पाणघोड्याने फोडला जंगलाच्या राजाला घाम; सिंहाची झालेली अवस्था पाहून व्हाल शॉक नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटरवर बसून रस्त्याने चाललेला दिसत आहे. तर, त्याच्या बरोबर डोक्याच्या वरती एक पक्षी उडताना दिसत आहे, या पक्षाची व्यक्तीसोबत अतिशय खास मैत्री आहे. ही मैत्री जरा विचित्र वाटली तरी सारस आणि माणसामधलं हे बंध अतूट आहे हे मात्र खरं. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती मोहम्मद आरिफ आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक वर्षापूर्वी आरिफला हा पक्षी शेतात जखमी अवस्थेत सापडला होता. यानंतर त्याने या सुंदर पक्षाला आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्याने पक्ष्याच्या जखमांवर उपचार करून त्याला पुन्हा उड्डाणासाठी योग्य केलं. मात्र एकदा आपले घाव भरल्यानंतर पक्षाने असं काही केलं जे पाहून गावातील सगळे लोक थक्क झाले. महिलेनं मगरीच्या जबड्यात हात घालताच प्राण्याने केला हल्ला अन्..; धडकी भरवणारा VIDEO हा पक्षी परत आकाशात उडलाच मात्र तो आरिफच्या घरीच येऊन थांबला. तेव्हापासून हा पक्षी आरिफचा सर्वात खास मित्र बनला आणि त्याच्यासोबतच राहातो. आरिफ जेव्हा कामासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा हा पक्षीही त्याच्यासोबत 30-40 किलोमीटरपर्यंत उडत प्रवास करतो. या दोघांच्या अनोख्या मैत्रिणी देशभरातील लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या