नवी दिल्ली 01 मार्च : जो बलवान आणि हुशार आहे तोच जंगलात जिंकतो. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात सिंह इतर प्राण्यांना त्रास देतो. त्यांच्यावर घात घालून हल्ला करतो. पण सिंहच स्वतःचा जीव वाचवून पळून जाताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पाणघोडा नाला ओलांडणाऱ्या सिंहांवर हल्ला करत आहे. हे पाहून सिंह अतिशय वेगात पळत सुटतात. महिलेनं मगरीच्या जबड्यात हात घालताच प्राण्याने केला हल्ला अन्..; धडकी भरवणारा VIDEO ट्विटरवर @WowTerrifying नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये तीन सिंह एका एक नाला ओलांडत असल्याचं तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात तिथे एक पाणघोडा येतो. सिंह आपल्यावर हल्ला करेल असं त्याला वाटतं. त्यामुळे याआधी तोच सिंहांवर वार करतो. हिप्पो त्यांच्या दिशेने येताना पाहून सिंह धावू लागतात. खूप वेगाने धावू लागतात. असं असूनही, हिप्पो त्यांच्यावर हल्ला करतोच.
दोन सिंह कसा तरी जीव वाचवून निसटतात, पण एक गरीब सिंह पाणघोड्याच्या तावडीत अडकतो. त्याचा जबडा अडकतो. हे दृश्य पाहून असं वाटतं की हा सिंह आता जिवंत राहणार नाही. पण सिंह हा जंगलाचा राजा आहे. तो एवढ्या जड आणि मोठ्या हिप्पोला धक्का देऊनही नाल्यातून बाहेर पडतो. सुमारे 18 सेकंदांचा हा व्हिडिओ काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला असून तो 40,000 वेळा पाहिला गेला आहे. तीन हजारांहून अधिक लोकांचे लाईक्स मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओसोबत कॅप्शन आहे, भयानक वेग! हिप्पो इतके धोकादायक का असतात ते तुम्ही पाहू शकता! व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, हिप्पो सिंहांना सांगत आहे, भाऊ, मी पाण्यातील राजा आहे. एका तरुणासाठी भिडल्या दोघी, तरुणींच्या हाणामारीचा Video तुफान व्हायरल हिप्पो हा अर्ध-जलचर प्राणी आहे, जो आपला बहुतेक वेळ पाण्यात किंवा चिखलात घालवतो. त्यांच्या बलाढ्य शरीरामुळे, ते पाण्यात पोहू शकत नाही, परंतु त्यांना पाण्यात राहणे खूप आवडते. यामुळेच त्यांना नदीचा घोडा असेही म्हणतात. पाण्यात पुढे जाण्यासाठी ते पोहत नाहीत, तर पायाने जमिनीवर ढकलतात. ते श्वास न घेता बराच काळ पाण्याखाली राहू शकतात. त्यांचे वजन 1500 ते 3200 किलोपर्यंत असू शकते. हत्ती आणि गेंडा यांच्यानंतर हा पृथ्वीवरील तिसरा वजनदार प्राणी आहे.