JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: श्वानाला वाचवण्यासाठी जीव घातला धोक्यात; पुराच्या पाण्यात उतरला व्यक्ती, शेवटी काय घडलं बघा

Viral Video: श्वानाला वाचवण्यासाठी जीव घातला धोक्यात; पुराच्या पाण्यात उतरला व्यक्ती, शेवटी काय घडलं बघा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खाली पुराच्या मध्यभागी असलेल्या पुलावर एक लांब शिडी बसवण्यात आली आहे. त्या शिडीवरून एक व्यक्ती कुत्र्याला वाचवून वरच्या दिशेने परतताना दिसत आहे.

जाहिरात

व्यक्तीने वाचवला श्वानाचा जीव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 जुलै : मागील काही दिवसांपासून टीव्हीवर पुराची भीषण दृश्ये बघून तुमचाही थरकाप उडत असेल. मान्सूनचं आगमन होताच देशाच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाने जी स्थिती निर्माण झाली आहे, ती चिंताजनक आहे. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होत असून जनावरंही या पुराला बळी पडत आहेत. माणसांची सुटका केली जात आहे पण प्राण्यांवरही पुराचा मोठा परिणाम झाला आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका माणसाने कुत्र्याला पुरापासून वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातल्याचं दिसतं. चंदीगडच्या एसएसपीने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कुत्र्याला वाचवण्याचं काम सुरू असल्याचं दिसतं. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं - “अग्निशमन विभागाच्या टीमने चंदीगड पोलिसांच्या टीमच्या मदतीने मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे खुदा लाहोर पुलाखाली अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला.” पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यात गुंतला आहे. पण मोकाट जनावरांनाही मदत करणं ही माणसाची जबाबदारी असते, हे रेस्क्यू टीमने दाखवून दिलं.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खाली पुराच्या मध्यभागी असलेल्या पुलावर एक लांब शिडी बसवण्यात आली आहे. त्या शिडीवरून एक व्यक्ती कुत्र्याला वाचवून वरच्या दिशेने परतताना दिसत आहे. त्याने एका हातात कुत्र्याला धरलं आहे आणि हळूहळू वर चढत आहे. वर येऊन तो कुत्र्याला दुसऱ्या व्यक्तीच्या हवाली करतो आणि मग बाहेर येतो. पाण्याचा प्रवाह किती वेगवान आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर तो कुत्रा बराच वेळ तिथे राहिला असता तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊन तो बुडाला असता, नाहीतर न खाता-पिता त्याचा मृत्यू झाला असता. सिंहिणींची शिकार चोरण्यासाठी पोहोचली मगर; इतक्यात शिकारी तिथे पोहोचले अन्.., अवाक करणारा शेवट, VIDEO या व्हिडिओला जवळपास 1 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की त्याने खूप छान काम केलं आहे. तर दुसऱ्याने म्हटलं की, या कामासाठी बचाव कार्यकर्त्यांचा सर्वांना अभिमान आहे. एक व्यक्ती म्हणाली - वाह भाऊ, खूप माणुसकीचं काम. अशी कामं विनाशाच्या परिस्थितीत मानवाच्या उद्धाराचं कारण बनतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या