तिरुअनंतपुरम 18 मार्च : पश्चिम बंगालचे रहिवासी एस.के. बदेश यांना अचानक आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी केरळ सरकारची 75 लाख रुपयांची स्त्री शक्ती लॉटरी जिंकली होती. हे कळताच ते आनंदात नाचू लागले, पण त्याचवेळी त्यांना भीतीही वाटू लागली. मंगळवारी रात्री उशिरा घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मुवत्तुपुझा पोलीस ठाणं गाठलं आणि लॉटरीसाठी सुरक्षेची मागणी करण्यास सुरुवात केली.
75 लाखांचा जॅकपॉट लागल्यावर थेट पोहोचला चौकीमध्ये, डिमांड ऐकून पोलीसही हैराण!
दोन कारणांसाठी पोलीस ठाण्यात गेल्याचं बादेश यांनी सांगितलं. प्रथम त्यांना औपचारिकता माहित नव्हती. लॉटरी जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम कशी मिळवायची हे त्यांना कळत नव्हतं. दुसरं म्हणजे, कोणीतरी आपल्याकडून तिकीट हिसकावून घेईल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात संरक्षणासाठी गेले.
यानंतर मुवट्टुपुझा पोलिसांनी त्यांना औपचारिकता समजावून सांगितली आणि पूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं. बदेश यांनी याआधीही लॉटरीत नशीब आजमावलं होतं, मात्र ते कधीही जिंकू शकले नाही. यावेळीही ते लॉटरीचा निकाल बघायला बसले तेव्हा त्यांना जिंकण्याची फारशी आशा नव्हती.
बदेश यांनी तिकीट खरेदी केलं तेव्हा ते एर्नाकुलममधील छोटानिकारा येथे रस्ते बांधणीचं काम करत होते. बदेश केरळमध्ये येऊन जास्त वर्षे झाली नाहीत आणि त्यांना मल्याळम नीट बोलता येत नाही, तसंच समजतही नाही. लॉटरीचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मित्र कुमारला बोलावलं.
बदेश यांनी सांगितलं की, पैसे मिळाल्यानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील आपल्या घरी परत जायचं आहे. ते म्हणाले, की त्यांच्या घराचं नूतनीकरण करण्याबरोबरच केरळमध्ये ते शेतीचा विस्तार करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Lottery, Viral news