एका नवरदेवाने अतिशय विचित्र कारण सांगत लग्न मोडलं 

नवरीला बारावीला कमी मार्क्स असल्याने आपण तिच्यासोबत विवाह करणार नसल्याचं त्याने म्हटलं 

वधूला बारावीत फार कमी गुण मिळाल्याचं कळल्यावर वराने लग्नाला नकार दिला.

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तिरवा कोतवाली परिसरात ही विचित्र घटना घडली. 

वराच्या निर्णयानंतर वधूच्या वडिलांनी सांगितलं की, अपेक्षेप्रमाणे हुंडा न मिळाल्याने नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न रद्द केलं

वधूच्या कुटुंबीयांना वराची हुंड्याची मागणी परवडत नसल्याने लग्न रद्द करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

अधिक हुंडा देऊ शकत नाही हे वधूच्या वडिलांनी वराला सांगितलं. 

यानंतर वराने नवरीच्या बारावीच्या निकालावर असमाधानी असल्याचं सांगून लग्न रद्द केलं

पोलीस आता दोन्ही कुटुंबांसोबत बोलून यावर तोडगा काढण्यास मदत करत आहेत