JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral video: रस्त्याच्या कडेला झोपले होते मायलेक; भरधाव कारचं चाक थेट डोक्यावरुन गेलं, पुढं काय घडलं पाहा

Viral video: रस्त्याच्या कडेला झोपले होते मायलेक; भरधाव कारचं चाक थेट डोक्यावरुन गेलं, पुढं काय घडलं पाहा

या घटनेत एका कारस्वाराने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या आई आणि मुलाच्या अंगावरुन आपली गाडी चालवली. मात्र आपली चूक समजताच महिलेला काही झालं आहे का हे पाहण्यासाठी तो कारमधून खाली उतरला.

जाहिरात

कारचं चाक डोक्यावरुन गेलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 जुलै : ‘हिट अँड रन’ची अनेक प्रकरणं समोर येत असतात. कधी भारतात तर कधी परदेशात अशा घटना पाहायला मिळतात. अनेकवेळा यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे हृदय पिळवटून टाकणारे असतात. याशिवाय अनेकवेळा असंही पाहायला मिळतं, ज्यात चुकून लोक दुसऱ्यांच्या अंगावर गाडी घालतात आणि नंतर त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा येईल. या घटनेत एका कारस्वाराने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या आई आणि मुलाच्या अंगावरुन आपली गाडी चालवली. मात्र आपली चूक समजताच महिलेला काही झालं आहे का हे पाहण्यासाठी तो कारमधून खाली उतरला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानासमोर रस्त्याच्या कडेला एक महिला आपल्या मुलासोबत आरामात झोपलेली असताना एक कार येऊन महिलेच्या अंगावर जाते. मात्र, पुढचं चाक महिलेच्या अंगावरुन जाताच कारस्वार गाडी थांबवतो आणि महिला सुखरूप आहे का, हे पाहण्यासाठी खाली उतरतो. सुदैवाने गाडी मुलाच्या अंगावरुन गेली नाही अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता.

संबंधित बातम्या

या घटनेत दोन्ही चाकं अंगावर गेल्यास महिलेचाही मृत्यू झाला असता, मात्र सुदैवाने या अपघातातून ती वाचली. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 80 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. एक्सरसाईझ करताना ती चूक बेतली जीवावर, फिटनेस एन्फ्लुएन्सरचा मृत्यू; VIDEO VIRAL हा धक्कादायक अपघात पाहून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही युजर्स या घटनेसाठी महिलेला दोष देत आहेत आणि म्हणत आहेत की तिला रस्त्यावर झोपण्याची काय गरज होती? तर काही वापरकर्ते कार चालकावर राग काढत आहेत की त्याला रस्त्यावर झोपलेले लोक कसे दिसले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या