बाली, 22 जुलै : व्यायाम शरीरासाठी जितका गरजेचा तितकाच तो करताना काळजीही घ्यायला हवी. विशेषतः जिममध्ये एक्सरसाईझ करताना एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. असंच घडलं ते इंडोनेशियातील एका फिटनेस इन्फ्लूएन्सर आणि बॉडीबिल्डरसोबत. जीममध्ये एक्सरसाइझ करताना त्याच्यासोबत विचित्र अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जस्टिन विकी असं या मृत बॉडीबिल्डरचं नाव आहे. 33 वर्षांचा जस्टिन विकी बालीमधल्या सनूर इथल्या पॅराडाइज जिममध्ये व्यायाम करत होता. बालीतल्या एका जिममध्ये तो 210 किलोग्रॅम वजनाच्या स्क्वॅट प्रेसिंगचा प्रयत्न करत होता. जस्टिन स्क्वॅट प्रेसिंग करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मदतीसाठी मागे एकच स्पॉटर होता. व्हिडिओत असं दिसत आहे, की जस्टिन विकी 210 किलो वजनाची बार्बेल खांद्यांवर घेऊन स्क्वॅट प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. स्क्वॅटिंग डाउननंतर त्याला वर उठता येत नसल्याचं दिसतं. दरम्यान, हे वजन उचलण्याच्या प्रयत्नात असताना बसलेल्या स्थितीत तो खाली पडला आणि बार्बेल त्याच्या मानेच्या पाठीमागच्या भागावर पडली. आधी भयंकर घडलं, नंतर झाला चमत्कार; अपघाताचा Shocking Video Viral ‘बाली डिस्कव्हरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, जस्टिन विकी वजन उचलण्याची क्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आणि पुढच्या बाजूला पडला. त्यामुळे वजन त्याच्या खांद्यावरून खाली पडलं आणि त्याच्या मानेवर आणि डोक्यावर पुढच्या दिशेने भार आला. जस्टिनच्या पाठीमागे वजन उचलण्याकरिता साह्य करण्यासाठी उभा असलेला स्पॉटर असहाय्य होता. कारण जस्टिन खाली जमिनीवर पडला आणि वजनं त्याच्या मानेवर पडली. ही दुर्घटना घडल्यानंतर जस्टिन विकीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं; मात्र त्याला झालेल्या जखमा गंभीर असल्याने त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. ‘डेली मेल’च्या हवाल्याने ‘चॅनेल न्यूज एशिया’ने दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की ‘या दुर्घटनेत जस्टिनची मान मोडली. तसंच, मेंदूकडून हृदय आणि फुफ्फुसाला जोडलेल्या नर्व्ह्ज दाबल्या गेल्या.’ या गंभीर दुखापतीमुळे जस्टिनचा मृत्यू झाला. Viral Video: चिमुकलीला समुद्रात पोहायला शिकवत होते वडील; पाण्यात टाकताच भयानक घडलं जस्टिन विकी ज्या जिममध्ये काम करायचा, त्या ‘दी पॅराडाइज बाली जिम’ने विकीचं खूप कौतुक केलं आहे. ‘जस्टिन विकी हा केवळ एक फिटनेस तज्ज्ञ नव्हता, तर तो अनेकांचं प्रेरणास्थान होता. सर्वांनाच तो पाठिंबा, पाठबळ द्यायचा, साह्य करायचा,’ असं ‘दी पॅराडाइज बाली’ जिमच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
This was brutal.
— Mahesh Nair (@MaheshNairNY) July 22, 2023
No safety rack.
Not enough spotters.
400 pounds.
Neck broke.
Internal decapitation.
RIP #justynvicky
https://t.co/YkKSxtQ6sU
@MaheshNairNY ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.