JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुत्रा समजून घरी आणला भलताच खतरनाक प्राणी; शेवटी व्यक्तीची झाली भयंकर अवस्था

कुत्रा समजून घरी आणला भलताच खतरनाक प्राणी; शेवटी व्यक्तीची झाली भयंकर अवस्था

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने त्याच्यासोबत कुत्र्याबाबतीत झालेल्या फसवणुकीची बातमी शेअर केली. या व्यक्तीने स्वत:साठी कुत्रा विकत घेण्याचा विचार केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 मार्च : आजच्या काळात लोक शोसाठी प्राणी खरेदी करू लागले आहेत. छाप पाडण्यासाठी लोक महागड्या ब्रीडचे प्राणी विकत घेतात. बर्‍याच वेळा लोकांना क्रॉस ब्रीड कुत्रे विकत घेऊ नका, असा इशारा दिला जातो. यामागे अनेक कारणं आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की क्रॉस ब्रीडिंगचा मुक्या प्राण्यांवर वाईट परिणाम होतो. अनेक धर्मादाय संस्थांचं म्हणणं आहे की डॉग ब्रीडर्सकडून कुत्रे विकत घेण्याऐवजी लोकांनी त्यांना दत्तक घ्यावं. पण आजच्या काळात याला व्यवसायाचं स्वरूप आलं आहे. आता जिथे धंदा असेल तिथे फसवणूक होतेच, हे उघड आहे. Rajsthan Holi 2023 : लग्न होत नाही म्हणून काढली जाते गाढवावरून वरात, वर्षभरानंतर रिझल्ट समोर सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने त्याच्यासोबत कुत्र्याबाबतीत झालेल्या फसवणुकीची बातमी शेअर केली. या व्यक्तीने स्वत:साठी कुत्रा विकत घेण्याचा विचार केला. तो कुत्रा आणण्यासाठी गेला असता तिथे त्याला एक क्रॉसब्रीड असल्याचं सांगून एक खतरनाक प्राणी दिला गेला. या व्यक्तीने पैसेही दिले. मात्र जेव्हा तो कुत्र्याला घेऊन घरी आला तेव्हा या प्राण्याने त्याच्या पायाला चावा केला. नंतर खुलासा झाला की ज्याला तो कुत्रा समजून घरी घेऊन आला आहे, तो एक जंगली प्राणी हायना आहे. Infared_Savage2 नावाच्या एका अकाऊंट यूजरने ही स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या कुत्र्याच्या विक्रीबाबत ऑनलाइनच माहिती मिळाली होती, असं त्यांनी सांगितलं. त्याने जाहिरात पाहिली आणि पिल्लू विकत घेतलं. पण त्याला घरी आणल्यावर त्याला काहीतरी गडबड जाणवली. त्याला समजलं की ज्याला गोंडस पिल्लू समजून घरी आणलं, तो दुसराच प्राणी आहे. खरं तर, ते हायनाचं पिल्लू होतं. ज्याला तो कुत्र्याचं पिल्लू समजून घेऊन आला, तो भलताच प्राणी निघाला. मात्र हे पिल्लू क्यूट होतं, परंतु व्यक्तीने त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करताच त्याने व्यक्तीवर हल्ला करत, आपल्या दाताने त्याच्या पायाला चावा घेतला.

त्या व्यक्तीने इतरांना ऑनलाइन अलर्ट केलं. श्वान पाळणाऱ्यांनी कुत्रे घेताना काळजी घ्या, असं त्या व्यक्तीने सांगितलं. बिझनेससाठी हे लोक धोकादायक प्राणीही तुमच्या हवाली करू शकतात, असं तो म्हणाला. त्या व्यक्तीने पिल्लाचा फोटोही शेअर केला, ज्यावर लोकांनी कमेंट्स केल्या. एका व्यक्तीने लिहिलं की, त्याने लायन किंगचा शत्रू विकत घेतला आहे. दरम्यान त्या व्यक्तीने हे पिल्लू परत केलं आहे आणि भविष्यात डॉग ब्रीडर्सकडून कधीही कुत्रा खरेदी करणार नाही, असं ठरवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या