JOIN US
मराठी बातम्या / Viral / जोशाजोशात भयंकर घडलं! सलग 24 तास रोमान्सचा भयानक The End

जोशाजोशात भयंकर घडलं! सलग 24 तास रोमान्सचा भयानक The End

पत्नीसोबत या व्यक्तीने दिवसभर रोमान्स केला. त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोम, 25 मे : रोमान्स हवाहवासा वाटला तरी एखादी व्यक्ती फार फार तर किती वेळ रोमान्स करू शकते? एक वेळ अशी येते की रोमान्स नकोसा होतो. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर तब्बल 24 तास सलग रोमान्य करत होती. जोशाजोशात या व्यक्तीने दिवसभर रोमान्स केला आणि त्याचा शेवट धक्कादायक झाला. इटलीतील ही धक्कादायक घटना आहे. 50 वर्षांची जर्मन व्यक्ती जिने सलग 24 तास रोमान्स केला. कॅस्टेल डे पियानोतल्या अपार्टमेंटमध्ये ही व्यक्ती आपल्या पत्नीसोबत रोमँटिक क्षण घालवत होती. पण त्यांचा हा रोमँटिक दिवस भयानक दिवसात बदलला.

रोमान्सनंतर या व्यक्तीची अवस्था इतकी भयंकर झाली की तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. या व्यक्तीला इटलीतीली ग्रोसेटो इथल्या मिसेरिकॉर्डिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जगातील सर्वात खतरनाक पोझिशनमध्ये केला रोमान्स; जोश चढला आणि त्याची लागली वाट रोंमान्सनंतर या व्यक्तीला सेप्टिक शॉक लागला होता. ज्यामुळे त्याला लिंग आणि अंडकोषांचा नेक्रोसिस झाला. ड्रग्ज घेऊन सेक्स केल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट अॅम्प्युट म्हणजे कापण्याची शक्यता वाढली आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं वृत्त मिररने दिलं आहे. स्थानिक मीडिया आऊटलेट्सच्या हवाल्यानुसार या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून एक आठवडा उलटला पण अद्याही त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. या व्यक्तीने शारीरिक संबंधाआधी ड्रग्ज घेतले आणि त्यानंतर रोमान्स केला. ड्रग्जमुळे या व्यक्तीला इतका जोश चढला की तिने 24 तास रोमान्स केला. ज्याचा असा भयंकर परिणाम झाला. कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था रोमान्स करताना असं काही पहिल्यांदाच घडलं नाही आहे. याआधी अशा काही घटना घडल्या आहेत. इंडोनेशियातील एका व्यक्तीने सर्वात धोकादायक पद्धतीने सेक्स केला आणि त्याचं लिंग फ्रॅक्चर झालं. युरोलॉजी केस रिपोर्ट्स या जर्नलमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्याचं लिंग सुजलं होतं आणि गडद जांभळं झालं होतं. याला वैद्यकीय परिभाषेत ‘एग्प्लान्ट डिफॉर्मिटी’ असं म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या