JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - बापरे! कारला लाथ मारताच हे काय घडलं? कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य

VIDEO - बापरे! कारला लाथ मारताच हे काय घडलं? कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य

कारला लाथ मारल्यानंतर व्यक्तीसोबत जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

जाहिरात

कारला लाथ मारताच भयंकर घडलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 एप्रिल : रागात व्यक्ती कधी काय करेल याचा नेम नाही. प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची, राग काढण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी रागात अबोला धरतं तर कुणी आक्रमक होतं, कुणी शांत बसतं तर कुणी आदळाआपट करतं. अशाच रागात असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्यक्तीने रागात एका कारला लाथ मारली. पण त्यानंतर त्याच्यासोबत भयंकर घडलं. एखाद्या कारला लाथ मारण्याचा असा परिणाम होऊ शकतो, याचा त्या व्यक्तीनेही विचार केला नसेल. कारला लाथ मारण्याची त्याला भयंकर अशी शिक्षा मिळाली आहे. ऑन दे स्पॉट त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्याही अंगावर काटा येईल.

तुम्ही पाहू शकता, पेट्रोलपंपवरील हा व्हिडीओ आहे. जिथं एक नवीकोरी आलिशान कार उभी असल्याची दिसते आहे. कारसमोर एक व्यक्ती उभी आहे. कारजवळून एक व्यक्ती चालत जाताना दिसते. ही व्यक्ती कारजवळ जाते आणि कारच्या पुढील भागावल लाथ मारते. दोन वेळा ती कारवर लाथा मारते. त्यानंतर ती अचानक जमिनीवर कोसळते. आश्चर्य! तोंडात बंदुकीच्या गोळ्या मारूनही व्यक्तीला काहीच झालं नाही; कशी राहिली जिवंत पाहा VIDEO तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, ज्या व्यक्तीने कारला लाथ मारली त्या व्यक्तीवर कारसमोर असलेल्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारी ही व्यक्ती कारची मालक असावी. जिने कुणाला तरी आपल्या कारवर लाथ मारताना पाहिलं आणि ती संतप्त झाली. जशी व्यक्तीने कारला लाथ मारली तशी ती व्यक्तीने आपल्या खिशातून बंदूक बाहेर काढली आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट गोळी झाडली. गोळी लागताच व्यक्ती खाली कोसळली. @clipsthatgohard ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की… काही जणांनी हा गोळीबार खरा असल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या