मुंबई, 05 एप्रिल : बंदुकीतून गोळी सुटली आणि ती कुणा व्यक्तीला लागली की त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तुम्ही प्रत्यक्षात नाही तर फिल्ममध्येही पाहिलं आहे. क्वचित प्रसंगी बंदुकीची गोळी लागल्यानंतर व्यक्ती बचावल्याही आहेत. पण ही गोळी हात-पाय अशा अवयवांना लागली असेल तर. पण जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडात बंदुकीची मारली ती व्यक्ती जिवंत राहिल का? साहजिकच नाही. पण एक व्यक्ती मात्र तोंडात बंदुकीची मारल्यानंतरही जिवंत राहिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने स्वतःवरच गोळ्या झाडल्या आहेत. त्याने आपल्या हातांनी बंदुकीतून आपल्या तोंडात गोळी मारली. एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा त्याने असं केलं. पण एकाही गोळीने या व्यक्तीला काहीच झालं नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? हे कसं शक्य आहे, असंच तुम्ही म्हणाल. आता नेमकं काय आणि कसं घडलं व्हिडीओमध्येच पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन व्यक्ती उभ्या आहेत. एका व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. या व्यक्तीच्या शरीरावर जवानाचा ड्रेस आहे, यावरून ती सैनिक असावी. VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की… ही व्यक्ती आपल्या तोंडात बंदूक धरून त्यातून गोळी झाडते. तेव्हाच आपल्याला धडकी भरते. आता असं दृश्य पाहिल्यावर या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असंच आपल्याला वाटतं. पण पुढे जे घडतं ते शॉकिंग आहे. या व्यक्तीला काहीच झालं नाही. उलट तोंडातील बंदुकीची गोळी तो तोंडातून बाहेर थुंकताना दिसला. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे माहिती नाही. HumansNoContext नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहताना अनेकांचा यावर विश्वास बसत नाही आहे. मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना? अनेक सोशल मीडिया युझर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी हे फेक म्हटलं आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.