JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIRAL VIDEO - तलावातील मगरींच्या कळपात व्यक्तीने फेकलं मांस, एक मगर मात्र पाण्याबाहेरच आली अन्...

VIRAL VIDEO - तलावातील मगरींच्या कळपात व्यक्तीने फेकलं मांस, एक मगर मात्र पाण्याबाहेरच आली अन्...

मगरींना खाणं द्यायला गेलेल्या व्यक्तीच्याच दिशेने एक मगर धावत आली. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

मगरीचा माणसावर हल्ला (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जून :  मगरींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिंह, बिबट्या, वाघ अशा भल्याभल्या प्राण्यां चाही मगरीसमोर टिकाव लागत नाही. मग माणसांचं तर सोडाच. पण तरी काही लोक असे आहेत, जे हौस म्हणून मगरींशीही पंगा घेतात किंवा काही लोकांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना ते करावं लागतं. थेट मगरींच्या संपर्कात येणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ, जो खूपच धक्कादायक आहे. मगरींचं साम्राज्य असलेल्या एका तलावाजवळ एक व्यक्ती गेली. मगरींना खाऊ घालण्यासाठी म्हणून ती मांस घेऊन आली होती. तिने तलावातील मगरींच्या कळपात मांस फेकलं. पण त्यानंतर पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. तलावात फेकलेलं मांस खाणं सोडून एक मगर तलावातूनच बाहेर आली. थरकाप उडवणारं असं हे दृश्य आहे. Crocodile dies in jagbudi : जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर आला महाकाय प्राण्याचा मृतदेह, कुणालाच काही कळेना व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तलाव मगरीने भरलेलं आहे. त्यांच्या अगदी जवळ एक व्यक्ती आहे. सुरुवातीला ती मगरींच्या दिशेने पाठ करून उभी आहे. तिच्या हातात एक मोठं मांस आहे. ते मांस हवेत गोलगोल फिरवत ती व्यक्ती मगरींच्या दिशेने भिरकावते. तलावात ते मांस फेकते. तशा सर्व मगरी त्या मांसावर तुटून पडतात. तलावाच्या किनाऱ्यावरून तलावाच्या आत जातात. एक मगर मात्र त्या मांसाकडे ढुंकूनही पाहत नाही. ती थेट पाण्याबाहेर पडते आणि त्या व्यक्तीच्या दिशेनेच धावत येते. जणू तिला प्राण्यांचं शिळं नव्हे तर माणसाचं ताजं मांसच हवं आहे, असं वाटतं. व्यक्तीची शिकार कऱण्याच्या तयारीत ती बाहेर येते. आपला भलामोठा जबडा उघडते. व्यक्तीच्या हातात एक काठी आहे. ती काठी त्या मगरीच्या डोक्यात मारते. तशी मगर घाबरते आणि पळून पुन्हा तलावात जाते. Shocking! एक छोटासा कोळी भारी पडला; तरुणीने आपला ‘तो’ अवयव गमावला @TheScaryNature या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

या व्हिडीओ पाहिल्यावर तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या