जगबुडी नदीमध्ये गेल्या काही महिन्यातली ही सातवी घटना घडली आहे. या नदीमध्ये प्रदूषण झाल्याने मगरीच्या मृत्यूचे प्रकार होतायत की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तीन महिन्यांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. नंतर सतत अशाच प्रकारे मगर मृत होऊन जगबुडी नदीपात्रात तरंगताना आढळत आहेत, त्यानंतर आता पुन्हा महाकाय मगर याच नदी पात्रात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
प्रत्येकवेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करत पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन केले आहे. मात्र, आत्तापर्यंत मागे मेलेल्या मगरींचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने मगरींचा मृत्यूचे नेमकं कारण काय? हे स्पष्ट झाले नाही.
तरीही मगरीच्या मृत्यूच्या घटना घडतच असून वन विभाग आणि पर्यावरण विभाग मात्र याकडे गांभीर्यपूर्वक पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आज (मंगळवार ६ जून) दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान वाहन चालकांना नदी किनारी राहणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना जगबुडी भोस्ते गावच्या पुलानजीक नदीच्या पाण्यावर मगर तरंगताना दिसली.
त्यांनी तात्काळ नगर प्रशासनाला आणि वन विभागाला कळवले. खेडचे वनपाल सुरेश उपरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून ही मगर शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवून दिला आहे.