मुंबई, 06 जून : एक छोटासा कोळी करून करून काय करतो, तर आपल्या घरात स्वतःचं घर बांधतो. एखाद्या कोपऱ्यात जाळं विणतो. त्याचा त्रास काय तर त्याने बनवलेली ही जाळी म्हणजे जळमटं कारण. बाकी तसा कोळ्याचा आपल्याला त्रास नाही. पण कधी विचार केला आहे, हा छोटासा कोळीही तुम्हाला महागात पडू शकतो. एका महिलेला तर एका कोळ्यामुळे आपला अवयव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणारी ही महिला, जिसं नाव क्रिस्टल जोसेफ असं आहे. 29 वर्षांच्या क्रिस्टलला फेब्रुवारीमध्ये तिला कोळी चावला. पण त्यानंतर इतका भयानक परिणाम होईल याचा विचारही तिने केला नव्हता. तिच्या पायाच्या तळव्याला हा कोळी चावला होता. जेव्हा कोळी चावला त्यानंतर काही दिवस तिला काहीच वाटलं नाही. पण हळूहळू तिचे पाय दुखू लागले, पायात खूप वेदना होऊ लागल्या. ती डॉक्टरला गेली. तेव्हा तिच्या पायाला छोटीशी जखम दिसली. Shocking Video! 2 तुकडे झाले तरी साप जिवंत, धडावेगळ्या झालेल्या तोंडाने स्वतःचंच शरीर खाल्लं तिला संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केली असता. हा संसर्ग झपाट्याने वाढत होता. तिचा पाय कापण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. क्रिस्टलला आपला जीव वाचवण्यासाठी जीव गमवावा लागला. पण शस्त्रक्रिया करूनही तिचा त्रास कमी झालेला नाही. तिला काही सेकंद किंवा मिनिटांसाठी अनेक वेळा कापलेल्या पायात वेदना आणि पेटके जाणवतात. तिला टाइप 1 मधुमेह असल्याने तिची परिस्थिती अधिकच बिकट झाली. मात्र ती नव्या आयुष्यासोबत जगायला शिकत आहे आणि कृत्रिम पायाच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. कोळी चावल्याने महिलेची हात कापण्याची वेळ याआधी ऑस्ट्रेलियातही महिलेला कोळी चावल्याने हात कापण्याची वेळ आली होती. जेना एलन असं या महिलेचं नाव आहे. 2014 साली पुरात लोकांची मदत करत होती. त्यावेळी एका डब्यात तिने हात घातला आणि तिच्या हाताला कुणी तरी जोरात चावा घेतला. या डब्यात एक कोळी होता. जसा तिला कोळी चावला तसं काही वेळ तिच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. ती रुग्णालयात गेली तिथं तिची स्किन ग्राफ्ट म्हणजे त्वचेची सर्जरी झाली. Mosquito facts : डास फक्त माणसांनाच चावतात का? मग जिथे माणसं नाही तिथे कसे जिवंत राहातात डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सर्जरीच्या एक वर्षानंतर तिच्या त्वचेवर डास चावल्यासारखी जखम झाली. जखम वाढत गेली आणि काही कालावधीने ती फुटली. तिने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तेव्हा डॉक्टरांनी तिला तिच्या हाता कॅन्सर पेशी तयार होत आहेत आणि त्या हातावर पसरत असल्याचं सांगितलं. कोळी चावल्याने हे झालं होतं. महिलेला जो कोळी चावला तो साधासुधा नाही तर विषारी आणि खतरनाक कोळी आहे. हा रेडबॅक स्पाइडर, ज्याला ऑस्ट्रेलियन ब्लॅड विडोही म्हटलं जातं. तो चावल्यानंतर अंगदुखी, पोटात वेदना, चक्कर येणं, हार्ट रेट वाढणं, बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसून येतात. हा कोळी चावल्यानंतर लगेच अँटीव्हेनमची गरज पडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.