पोटातील गॅसमुळे आग
मुंबई, 12 मार्च : पोटातील गॅस शरीराबाहेर फेकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया. गॅस शरीराबाहेर टाकताना आवाज येतो, त्या गॅसची दुर्गंधीही येते. पण कधी पोटातील या गॅसमुळे आग लागल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? असाच एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने पोटातील गॅस सोडताच आग भडकल्याच्या धक्कादायक व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोटातील गॅस चांगला नव्हे, त्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पोटात गॅस झाल्यावर कित्येक त्रासाला सामोरं जावं लागतं हे प्रत्येकाला माहितीच आहे. पोटातील गॅस बाहेर आल्यावरही इतरांना किती त्रास होतो, तेसुद्धा माहिती असेल पण हा गॅस यापेक्षाही जास्त खतरनाक ठरू शकतो, हे दाखवणारा हा व्हिडीओ कदाचित पहिल्यांदाच तुम्हीही पाहत असाल. बापरे! साधं सर्दी-पडसं म्हणून अंगावर काढलं; महिलेने गमावले आपले दोन्ही पाय व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी पार्टी चालू आहे. पाहुणे जेवणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. काही जण डान्स करण्यात व्यस्त आहेत. इतक्यात सर्वांची नजर या एका व्यक्तीवर पोहोचते. जी पार्टीत स्टंट दाखवण्यासाठी येते. व्यक्तीच्या समोर एक आग आधीच पेटवलेली दिसते आहे. ही व्यक्ती त्या आगीकडे पाठ करते आणि आपली शॉर्ट काढून वाकून आपल्या पार्श्वभागातून त्या आगीच्या दिशेने गॅस सोडते.
व्हिडीओत त्या व्यक्तीच्या शरीरातून वेगाने बाहेर पडणारा गॅसही स्पष्ट दिसतो. जसा गॅस बाहेर येतो तसा तो त्या आगीवर जातो आणि आग भडकते. जितक्या भागावर गॅस होता, तिथून आगीच्या ज्वाळा निघतात. व्यक्ती चारही बाजून फिरतो, त्यासोबत त्याच्यामागे असलेल्या गॅससोबत ती आगही फिरताना दिसते. काही वेळाने व्यक्ती आपल्या पाठीमागे जोरात हात मारते आणि आग विझवते. पोटात गॅस होतोय? हे सोपे उपाय कराल तर कायमचा कमी होईल त्रास ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. amrit96966 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. असं दृश्य पाहून तिथं उपस्थित लोकच नव्हे तर नेटिझन्सही हादरले आहेत. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
खरंच पोटातील गॅसमुळे असं काही होऊ शकतं, का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.