JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुण बाईकवरुन जात असताना, रस्त्याच्या कडेला दिसला सिंह आणि... पुढे जे घडलं ते व्हिडीओत कैद

तरुण बाईकवरुन जात असताना, रस्त्याच्या कडेला दिसला सिंह आणि... पुढे जे घडलं ते व्हिडीओत कैद

हा क्षण पाहून एका वापरकर्त्याने लिहिले की हे सामान्य अजिबात नाही.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सिंह हा ‘जंगलाचा राजा’ आहे. तो सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या तावडीत एखादा प्राणी आला की त्याचं काही खरं नाही. कारण सिंह असा हिंस्र प्राणी आहे, त्याच्या जबड्याची ताकद देखील अशी आहे की, तो कोणत्याही प्राण्याचे लचके तोडू शकतो. त्यामुळे प्राणीच काय तर माणसं देखील सिंहापासून लांब पळतात. पण अशात तीन तरुणांनी जिवाशी खेळ करत सिंहासमोरून जाण्याची हिंमत केली.

ही घटना गुजरातमधील गीर येथील असल्याचा दावा केला जात आहे. जिथे एक सिंह रस्त्याच्या कडेला विसावला होता. त्याचवेळी मोटारसायकलवर बसलेले तिघेजण त्याच्या समोरून जातात. तेवढ्यात सिंह उठतो. पण नशिबाने त्याने काहीच केलं नाही. तो फक्त मोटारसायकलकडे टक लावून पाहत राहिला. पण तो आपल्या जागेवरून उठला नाही. हा क्षण पाहून एका वापरकर्त्याने लिहिले की हे सामान्य अजिबात नाही. जर सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्यांना किती महागात पडलं असतं. काही वापरकर्त्यांनी लिहिले की सिंह मूडमध्ये नाही, अन्यथा त्याचे काम संपले असते. Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभे राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि… 20 एप्रिल रोजी @WildTrails.in या पेजद्वारे इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – गीर राष्ट्रीय उद्यानात सिंह-मानव बाँडिंग. गिर नॅशनल पार्क हे आफ्रिकेशिवाय जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे सिंह त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) दिसू शकतो. गीरच्या जंगलात सस्तन प्राण्यांच्या ४० प्रजाती आणि पक्ष्यांच्या ४२५ प्रजाती आहेत.

संबंधित बातम्या

एका Reddit वापरकर्त्याने (u/SatyaAryan) हा व्हिडिओ महिनाभरापूर्वी २१ मार्च रोजी पोस्ट केला होता. मात्र हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. पण ही क्लिप पाहून लोकांना धक्का बसला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या