मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभे राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि...

Video : झोपलेल्या वाघाला बघताच स्तब्ध उभे राहिले हरिण, तेवढ्यात वाघ उठला आणि...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ वाघ आणि हरणाशी संबंधीत आहे. ज्यामध्ये एक वाघ आळशीपणे जंगलात झोपला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही, येथे आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. हे खूपच मनोरंजक असतात. म्हणून तर ते पाहण्यात आपला वेळ कसा निघून जातो हे आपलंच आपल्याला कळत नाही. तसेच येथे प्राण्यांशी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे थरारक शिकारीचे असतात, तर काही आश्चर्यकारक असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Video : जिराफच्या पिल्लावर सिंहीणीचा हल्ला, आईची एन्ट्री होताच खेळच पलटला

हा व्हिडीओ वाघ आणि हरणाशी संबंधीत आहे. ज्यामध्ये एक वाघ आळशीपणे जंगलात झोपला आहे. तेव्हा त्याच्यासमोर शिकार आला, पण त्यानंतर त्याने जे केलं ते खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे.

वाघाच्या समोर कोणी आलं तर वाघ त्याला सोडणार नाही, हे तर आपल्याला माहित आहे. पण आळशी वागाने तसं केलं नाही, ज्यामुळे हरणाचे प्राण वाचले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वाघ जंगलात कसा झोपलेला दिसत आहे. असे दिसते की तो भुकेने झोपला आहे. काही वेळाने दोन मोठे हरणे (सांबर) त्याच्या समोर धावत आले आणि ते वाघाला पाहताच तेथे उभे राहिले. मात्र वाघ जसा उठला तसंच हरणांनी तेथून पळ काढला.

वाघ उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत राहिला पण हरणाला पकडण्यासाठी एकही पाऊल उचलू शकला नाही.

या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचा नजारा पाहायला मिळला आहे, तो सहसा पाहायला मिळत नाही. जंगली प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ big.cats.india या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्सही नेहमीप्रमाणे यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Tiger, Videos viral, Viral, Wild life