व्हायरल व्हिडीओ
मुंबई : कोणताही कार्यक्रम म्हटला की तो नाच-गाण्याशिवाय अपूर्णच आहे. लग्नात तर डान्स हा हमखास असतोच. भारतीयांमध्ये तर डान्स करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. लोक अगदी कसे ही नाचू लागतात. भारतात तर अगदी काही कार्यक्रमात मनोरंजक डान्स करण्याची स्पर्धा देखील होते. यामध्ये लोक कधी नागिण डान्स तर कधी मुर्गा डान्स तर कधी लोक कोणता डान्स काढतील याचा नेम नाही. आता सोशल मीडियावर एक मुर्गा डान्स व्हायरल होत आहे. एक तरुण असा काही नाचत आहे की ते पाहून नक्कीच तुमचं मनोरंजन होईल.
हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे. जो पाहून तुमचं पोट दुखू लागेल. आतापर्यंतचा सर्वात मजेदार कॉक डान्स व्हिडीओ म्हणता येईल. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की हाच खरा कोंबडा डान्स आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये, एका तरुणाने आपल्या मागे झाडू बांधला आहे, तसेच एका मोठ्या हंड्याने आपलं तोंड झाकून घेतलं आहे. तसेच त्याने आपल्या हातात काहीतरी बांधलं आहे. या अवस्थेत तो सेम टू सेम कोंबड्या सारखी बॉडिलँग्वेजने नाचत आहे. वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोकांनी त्यावर भरभरुन कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तर मजेदार पद्दतीने असं म्हटलं आहे की नाचणं बंद कर नाहीतर कोणीतरी खरा कोंबडा समजून भाजून खाईल.
गा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 12m_queen__ नावाच्या आयडीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे, ज्याला पाहून लोक हसत आहेत.