मराठी बातम्या /बातम्या /Viral /वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video

वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video

माकडांचं भांडण

माकडांचं भांडण

या भांडणात माकड आणि वानर दोघेही एकमेकांसमोर येतात आणि आपापसात भिडतात. त्यानंतर तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशी चुरशीची भांडणं या दोघांमध्ये रंगते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, हे व्हिडीओ कधी शिकारीचे असतात, तर एखाद्या गंमतीदार प्रसंगाचे. प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही दोन प्राण्यांचं भांडण पाहिलं असेल. सध्या अशाच भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा व्हिडीओ दोन माकडांच्या भांडणाचा आहे. हे माकड एका गावात भांडण करत असतात. तेव्हा या दोघांचं भांडण पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा झालं आहे.

बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला

भांडणं किंवा मारामारी पाहायला कोणाला आवडत नाही, माणसाकडे वेळ नसला तरी अगदी एक मिनीट माणूस आवर्जून काढतो आणि काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तसंच हे गावकरी देखील उत्सुक आहेत की माकडांमध्ये नक्की झालंय तरी काय?

या भांडणात माकड आणि वानर दोघेही एकमेकांसमोर येतात आणि आपापसात भिडतात. त्यानंतर तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशी चुरशीची भांडणं या दोघांमध्ये रंगते. त्यांच्या भांडणाने तर गावकऱ्यांचीही पळता भूई थोडी केली आहे.

नक्की काय घडलं?

या व्हिडीओमध्ये माकड आणि वानर दोघेही एका गावात येतात. तेथे ते आधी एकमेकांना राग देत असतात आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतात. दोघांची झुंज पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने वानर समोर बसलेल्या माकडाला कानशिलात मारतो. या एका कानशिलाने या दोघांमधील भांडण असं काही पेटलं की बस्स...

" isDesktop="true" id="851936" >

माकड आणि वानर गावात इकडे-तिकडे असे काही भांडू लागले की तेथे जवळच उभे असलेल्या गावकऱ्यांना पळवून लावले. या दोघांच्या मोठ्या भांडणामुळे गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि ते देखील इकडे तिकडे पळू लागले.

हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वी मुकीम अहमद नावाच्या व्यक्तीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. हा व्हिडीओ 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. माकडांची ही अशी भांडणं पाहायला लोकांना फारच गंमत वाटत आहे, म्हणूनच हा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

First published:

Tags: Monkey, Social media, Top trending, Videos viral, Viral, Wild life